Uncategorizedताज्या बातम्या

सुसाईड नोट सोशल मीडियावर टाकून माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब माळी बेपत्ता

भोसे (क‌.) (बारामती झटका)

भोसे जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य आणि दत्तकृपा पेट्रोल पंपाचे मालक बाळासाहेब राजाराम माळी यांनी सोमवारी रात्री साडेनऊ वाजता सोशल मीडियावर आत्महत्या करीत असल्याची सुसाईड नोट लिहून पाठवल्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पंढरपूर तालुक्यातील भोसे येथे माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब माळी यांचा दत्तकृपा पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपावर मॅनेजर म्हणून पंढरपूर येथील तानाजी कोळी आणि बाळासाहेब माळी यांचे पुतणे प्रदीप माळी हे सर्व कामकाज पाहत होते. या दोघांनी आर्थिक व्यवहारांमध्ये मोठा घोटाळा करत एक कोटी एकवीस लाखांचा अपहार केला असल्याची सुसाईड नोट बाळासाहेब माळी यांनी सोमवार दि. 15 रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास व्हाट्सअप ग्रुप वर टाकली. तानाजी कोळी यांनी केलेल्या आर्थिक फसवणुकीला आणि दमबाजीला कंटाळून मी कुटुंबासह आत्महत्या करीत आहे. मी खूप लांब आलो आहे. मला शोधण्याचा प्रयत्न करू नये, असा मेसेज व्हाट्सअप ग्रुप वर टाकून ते आपल्या परिवारासह बेपत्ता झाले आहेत.

बाळासाहेब माळी यांनी व्हाट्सअप ग्रुप वर टाकलेला संदेश – मी आत्महत्या करीत आहे. मला शोधण्याचा प्रयत्न करू नये. मी खूप लांब आलो आहे‌. हा माझा शेवटचा मेसेज आहे. माझा विश्वासघात केला आहे. मॅनेजर तानाजी कोळी पंढरपूर व माझा पुतण्या प्रदीप माळी या दोघांनी मला व माझ्या पत्नीला विश्वासात घेऊन माझे दत्तकृपा पेट्रोलियम भोसे हे दोघे विश्वासू म्हणून बघत होते. माझा व माझ्या पत्नीच्या स्वभावाचा फायदा घेऊन यांनी एक कोटी एकवीस लाखांची फसवणूक केली आहे. मी जमीन विकून व सांगोला अर्बन बँकेतून कर्ज घेऊन पंप चालू केला. हे दोघे मी विचारले की, काही अडचण नाही. आम्ही प्रामाणिकपणे करीत आहोत, असे सांगायचे‌.

एका महिला व्यावसायिकेची फसवणूक झाली आहे. माझी पत्नी सौ. सुरेखा माळी भोसे. अचानक भांडवल बंद पडले त्यामुळे पंप बंद पडल्याचे माझ्या लक्षात आले. मी सी. ए. जोशी, पुणे यांच्याकडून हिशोब मागितला असता मला धक्का बसला. यांनी आम्ही सात लाख घेतली असल्याचे बोगस लिहिले. तरीही त्यांच्याकडे 99 लाखाला फसवले आहे व त्यामुळे बँकेला पंधरा लाख व्याज गेले आहे. असे सर्व मिळून एक कोटी एकवीस लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. (यात काही रक्कम वाढू शकते किंवा थोडी कमी होऊ शकते). वरून मला तानाजी कोळी म्हणतो की, मी व माझ्या ग्रुपने मिळून तीन खून केले आहेत, पाच हाफ मर्डर व कित्येक लोकांना मारले आहे. माझ्याविरुद्ध कोणीही तक्रार देऊ शकत नाही.

त्यामुळे मला व माझ्या परिवाराला व पंपावरती असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जीवतास धोका आहे. कोळीने आतापर्यंत ज्या पंपावर काम केले आहे, त्यांना फसवले आहे. गुप्तपणे माहिती घ्यावी. कारण समोर येण्यास कोणी तयार नाही. दारू पिऊन रात्री अचानक पंपावरती येतो, यातून मी सावरत नाही. म्हणून माझ्याकडे आत्महत्येशिवाय पर्याय नाही. तरी आपण इतर संबंधितांची मदत घेऊन माझ्या परिवाराला न्याय मिळवून द्यावा ही विनंती. परमेश्वर आपल्या परिवाराचे कल्याण करेल.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button