ताज्या बातम्या

स्मृतीशेष सोनाबाई दत्तात्रय माने शेंडगे यांच्या प्रथम स्मृतीदिनाचे औचित्य साधून ह.भ.प. नेहाताई भोसले साळेकर यांच्या कीर्तनाचे आयोजन……

वाघोली (बारामती झटका)

मराठा सेवा संघ पुणे विभागीय अध्यक्ष शिवश्री उत्तमराव माने यांच्या मातोश्री स्मृतीशेष सोनाबाई दत्तात्रय माने शेंडगे यांचे दि. १७ जुलै २०२२ रोजी निधन झाले होते. त्यांचा तारखेनुसार प्रथम स्मृतिदिन दि. १७ जुलै २०२३ रोजी वाघोली (माने शेंडगे वस्ती) येथे साजरा होणार असून सदर दिवशी सकाळी १० वाजता स्मृतीशेष सोनाबाई दत्तात्रय माने शेंडगे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून त्याच ठिकाणी ह. भ. प. नेहाताई भोसले यांचे कीर्तन होणार असून दुपारी १२ वाजता पुष्पवृष्टी होऊन समस्त माने शेंडगे परिवाराच्यावतीने भोजनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

वरील कार्यक्रमास सर्व पाहुणे, मित्रमंडळी, वाघोली व वाघोली पंचक्रोशीतील नागरिकांनी तसेच सामाजिक, राजकीय क्षेत्रातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन स्मृतीशेष सोनाबाई दत्तात्रय माने शेंडगे यांचे पुत्र शिवश्री उत्तमराव दत्तात्रय माने शेंडगे (पुणे विभागीय अध्यक्ष म. से. सं.), शिवश्री दिगंबर दत्तात्रय माने शेंडगे (माजी उपसरपंच ग्रा.पं. वाघोली), शिवश्री सुनील दत्तात्रय माने शेंडगे (प्रगतशील बागायदार ), शिवश्री अनिल दत्तात्रय माने शेंडगे (उपसंचालक भूमी अभिलेख पुणे विभाग)
यांनी केले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button