ताज्या बातम्याराजकारणसामाजिक

आ. नितेश राणे व आ. महेशदादा लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत माळशिरस येथे जन आक्रोश मोर्चाचे आयोजन….

सकल हिंदू समाज माळशिरस यांच्या वतीने सर्टिफाईड ग्राउंड येथे जन आक्रोश मोर्चानिमित्त जाहीर सभेचे आयोजन

माळशिरस (बारामती झटका)

आमदार नितेश राणे व आमदार महेशदादा लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत माळशिरस तहसील कार्यालय येथे जन आक्रोश मोर्चाचे आयोजन शनिवार दि. 27 जानेवारी 2024 रोजी जन आक्रोश मोर्चाचे सकल हिंदू समाज माळशिरस तालुका यांच्यावतीने करण्यात आलेले आहे.

सदर जन आक्रोश मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत सर्टिफाइड ग्राउंड येथे सायंकाळी पाच वाजता होणार असून सदरच्या ठिकाणी उपस्थित मान्यवर मोर्चांना संबोधित करणार आहेत. तरी सकल हिंदू समाज माळशिरस यांच्या वतीने जन आक्रोश मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आलेले आहेत.

आपण काही कामानिमित्त व अपरिहार्य कारणामुळे बाहेरगावी असाल तर आपणांस कार्यक्रम पाहता यावा, उपस्थितांची मनोगते ऐकता यावीत, यासाठी सदरचा कार्यक्रम बारामती झटका यूट्यूब चॅनल वर लाईव्ह (थेट) प्रक्षेपण होणार आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button