स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माढा लोकसभा अध्यक्ष कमलाकर माने देशमुख यांचा वाढदिवस सामाजीक उपक्रमाने साजरा
वेळापूर (बारामती झटका)
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माढा लोकसभा अध्यक्ष कमलाकर माने देशमुख यांनी वाढदिवसानिमित्त सकाळी आई-वडील व थोरले बंधू यांचे आशीर्वाद घेवून वेळापूरमधील महापुरुषांना हार घालून दर्शन घेतले. कमलाकर माने देशमुख यांनी वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून त्याऐवजी सामाजिक उपक्रम म्हणून जि.प. प्राथमिक शाळा शेरी, वेळापुर या शाळेला उपयोगी येण्यासारखी १० हजार रुपये किंमतीचे शोकेस कपाट भेट दिले.
कमलाकर माने देशमुख यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमांमध्ये सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे नूतन व्हाईस चेअरमन शंकरराव माने देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूजचे नूतन संचालक बाळासो माने देशमुख, भारतीय जनता पार्टी माळशिरस तालुका उपाध्यक्ष अमरसिंह माने देशमुख, बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदेश प्रवक्ते काकासाहेब जाधव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष मदनसिंह जाधव, रयत क्रांती शेतकरी संघटनेचे राहुल बिडवे, वंचित बहुजन आघाडीचे गोपाळ घार्गे, स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडी जिल्हा उपाध्यक्ष दत्ता भोसले, मांडवे सोसायटी चेअरमन दिपक माने देशमुख, वीरकुमार दोशी, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष युवराज मंडले, डॉ. अमरसिंह माने देशमुख, माजी सरपंच हनुमंतराव साळुंखे, डॉ. सचिन शेंडगे, स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष अजित बोरकर, महेंद्र साठे, सुभेदार मेजर विशाल, स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा माळशिरस तालुका अध्यक्ष अजित कोडग, बाळासाहेब चव्हाण, भागवत साठे, दुर्गेश साळुंके, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वेळापूर शहर अध्यक्ष सचिन पवार, सुखदेव शेळके पाटील, शाळेतील सर्व शिक्षक वर्ग, माने देशमुख मित्र मंडळ ग्रुप वेळापूर शेरी आदींच्या उपस्थितीत यावेळी शुभेच्छा दिल्या. तसेच वेळापूर शेरी येथे कमलाकर माने देशमुख यांच्या निवासस्थानी त्यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng