12 मार्च रोजी वाढदिवस साजरा न करण्याचा मा. आमदार राम सातपुते यांचा निर्णय…

माळशिरस तालुक्यात असं एक गाव नाही की तिथं भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव तथा माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय आमदार राम सातपुते यांच्या वाढदिवसाचा बॅनर नाही…
आरोग्यदूत राम सातपुते यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांनी सामाजिक उपक्रमांनी साजरा केला….
माळशिरस (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे लाडके नेते उपमुख्यमंत्री स्वर्गिय अजितदादा पवार यांचे निधन झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रासाठी दुःखाचा फार मोठा प्रसंग आहे. या शोकाकुल वातावरणात वाढदिवस साजरा करणे, माझ्या मनाला पटणारे नाही. म्हणून 12 मार्च रोजी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या दिवशी मी आपणांस भेटून आपल्या शुभेच्छा स्वीकारू शकणार नाही याबद्दल क्षमस्व, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव तथा माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार आरोग्यदूत राम सातपुते यांनी सोशल मीडियावर कार्यकर्त्यांना व सहकार्यांना विनम्र आवाहन केलेले आहे…
स्वर्गीय अजितदादा पवार व तत्कालीन आमदार राम सातपुते यांचे जिवाभावाचे राजकारणापलीकडचे मैत्रीचे राजकीय संबंध होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये अजितदादा उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री होते. त्यावेळेस आमदार राम सातपुते यांच्या पत्रावर अनेकवेळा निधी मंजूर केलेला आहे. माळशिरस-पिलीव रस्त्याला खास करून अजितदादांनी 24 कोटी रुपये मंजूर केलेले होते. अशी अनेक विकासकामे राजकारणापलीकडे अजितदादा यांनी केलेली होती.

सध्या अजितदादा महायुतीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदावर असताना दुर्दैवी मृत्यू झाल्याने राम सातपुते यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी हार, तुरे, फेटा, गुच्छ न घेण्याचा निर्णय घेतलेला आहे…
माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार आरोग्यदूत राम सातपुते यांच्याकडे भारतीय जनता पक्षाने प्रदेश सचिव पदाची जबाबदारी दिलेली आहे. प्रदेश सचिव व वाढदिवस कार्यकर्त्यांना दुग्धशर्करा योग असल्याने माळशिरस तालुक्यात असं एक गाव नाही की तिथं भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव तथा माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांचा नियुक्तीचा व वाढदिवसाचा बॅनर नाही. यालाच खरे नेता आणि कार्यकर्ता यांच्यामधील प्रेमाचे व जिवाभावाच्या मैत्रीचे प्रतीक समजले जाते. माळशिरस तालुक्यात अनेक कार्यकर्त्यांनी आरोग्यदूत राम सातपुते यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरे करीत आहेत. अनेक ठिकाणी रक्तदान शिबिर, सर्वरोग निदान शिबिर, गोरगरीब व सर्वसामान्य जनतेच्या अडचणी दूर करून शासकीय योजनेचा लाभ देण्याकरता कागदपत्रे, दाखले यांचे कॅम्प भरवलेले आहेत. त्याचबरोबर क्रिकेट स्पर्धा अशा अनेक सामाजिक उपक्रमांनी कार्यकर्त्यांनी वाढदिवस साजरे केलेले आहेत.
श्रीक्षेत्र महालक्ष्मी ग्रामविकास प्रतिष्ठान यांनी महाराष्ट्रात सर्वात मोठी बैलगाडा शर्यत देवाभाऊ केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन केलेले होते. सदरच्या बैलगाडा शर्यतीत प्रथम क्रमांक दोन लाख रुपये व चषक बक्षीस होते. यामध्ये 460 बैलगाडा चालक-मालक यांनी सहभाग घेतलेला होता. दोन्ही बाजूंनी गॅलरी, भव्य स्टेज व महिलांना बसण्याची स्वतंत्र व्यवस्था केलेली होती. सदरची स्पर्धा वाढदिवसानिमित्त होती. कार्यकर्त्यांनी यशस्वी केलेली आहे…

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



