सोलापूर जिल्ह्यातून तुतारी हद्दपार, अकरा पंचायत समितींपैकी दहा पंचायत समितींवर कमळ फुलले…

नाकाने वांगी सोलणारे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी नाकच ठेवले नाही….
माळशिरस (बारामती झटका)
सोलापूर जिल्ह्यातील अकरा पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाच्या निवडी पार पडलेल्या आहेत. त्यामध्ये दहा पंचायत समितींवर भारतीय जनता पार्टीचे सभापती झालेले आहेत तर एका पंचायत समितीवर शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा सभापती झालेला आहे. सोलापूर जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा एकही सभापती झालेला नाही. सोलापूर जिल्ह्यातून तुतारी हद्दपार होवून अकरा पंचायत समितींपैकी दहा पंचायत समितींवर महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्ह्यात कमळ फुलवलेले आहे. निवडणुकीपूर्वी नाकाने वांगी सोलणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सभापती निवडीच्या राजकीय खेळीने नाकच ठेवले नाही, अशी सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे..
सोलापूर जिल्ह्यात अकरा पंचायत समिती आहेत. त्यापैकी दहा पंचायत समितींवर भाजपचे सभापती झालेले आहेत. अक्कलकोट सौ. रश्मी सागर हिप्परगी, दक्षिण सोलापूर श्री. संदीप अमृत टेळे, उत्तर सोलापूर तेजस्विनी अमोल बोराडे, मोहोळ श्री. असलम गफूर चौधरी, बार्शी सौ. मीनाक्षी मुरलीधर रोंगे, करमाळा सौ. पूजा सचिन ढेरे, माढा श्री. पंडित तुकाराम देशमुख, मंगळवेढा श्रीमती दिपाली आनंद ताड, सांगोला सौ. पुनम सुदर्शन इंगवले, पंढरपूर श्री. शुभम सुरेश आगावणे तर माळशिरस येथे शिवसेना एकनाथ शिंदे सेनेचे श्री. दत्तात्रेय रावसाहेब मगर असे सभापती झालेले आहे.

महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मंत्रिमंडळात जयकुमार गोरे यांची वर्णी लावून ग्रामविकास व पंचायत राज खात्याची जबाबदारी दिलेली होती. माढा लोकसभेचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्यासह जिल्ह्यातील अनेक नेते व कार्यकर्ते यांनी सोलापूर जिल्ह्याची पालकमंत्री पदाची धुरा जयकुमार गोरे यांच्याकडे द्यावी, असा आग्रह मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केलेला होता. जिल्ह्याच्या मागणीप्रमाणे नामदार जयकुमार गोरे यांना सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली. दरम्यानच्या काळामध्ये जयकुमार गोरे पालकमंत्री होऊ नये, यासाठी अकलूजच्या निरा नदीच्या काठी किल्ल्याच्या बाजूला काळ्या बाहुल्यांचा प्रयोग झालेला होता. सोलापूर जिल्ह्यातील मोहिते पाटील यांच्या एक हाती सत्तेला सुरुंग लागणार होता. त्यामुळे मोहिते पाटील अस्वस्थ होते. मानसिक संतुलन बिघडल्यासारखे सोशल मीडियावर स्वतः व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून उलट सुलट जयकुमार गोरे यांच्याबद्दल अपप्रचार सुरु होता.

सोलापूर महानगरपालिकेत पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीची सत्ता स्थापन झालेली आहे. ग्रामीण भागात सुद्धा पंचायत समितीच्या सभापती निवडीनंतर भारतीय जनता पार्टीची ताकद वाढलेली आहे.
धैर्यशील मोहिते पाटील अनेकवेळा समाज माध्यमांवर पालकमंत्री स्थानिक असावा, बाहेरचा उपरा नसावा अशी वक्तव्य करीत होते. कारण सोलापूर जिल्ह्यातील एकाधिकारशाही उध्वस्त करण्याचे सामर्थ्य जयकुमार गोरे यांच्यातच आहे हे ओळखून पोकळ वल्गना करीत होते. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जयकुमार गोरे यांच्यावर विशिष्ट जबाबदारी टाकलेली होती. निश्चितपणे महानगरपालिका पंचायत समिती या निवडणुकीत दाखवून दिलेली आहे. सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातून मोहिते पाटील हद्दपार होत आहेत. जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या निवडी शिवरत्न बंगला येथूनच होत होत्या. परंतु जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती निवडीत सुद्धा शिवरत्न बंगला वगळून होणार असल्याने पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा मोहिते पाटील गटावर वरचष्मा झालेला असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



