…… अखेर अकलूजच्या पाण्याचा प्रश्न, त्रिमूर्ती लोकप्रतिनिधी यांची शिष्टाई कामी आली टॅंक मध्ये पाणी दाखल…..

पाणीदार मा. खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, पालकमंत्री जयकुमार गोरे, लोकप्रिय दमदार मा. आमदार राम सातपुते यांच्या प्रयत्नाला यश…
माळशिरस (बारामती झटका)
माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे, भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या प्रयत्नाला यश आलेले आहे. 21 दिवसानंतर येणारे पाणी दहाच दिवसांमध्ये आलेले आहे. अकलूजच्या पाण्याचा प्रश्न त्रिमूर्ती लोकप्रतिनिधी यांची शिष्टाई कामी आली असून टॅंक मध्ये पाणी दाखल झालेले आहे. अकलूजकरांमधून त्रिमूर्तींचे अभिनंदन व ऋण व्यक्त केले जात आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत अशी अकलूज ग्रामपंचायतीची ओळख होती. पूर्वीच्या अकलूज ग्रामपंचायतीमधून अनेक ग्रामपंचायती विभक्त केलेल्या आहेत. अकलूज शहरांमध्ये अनेक नवीन उपनगरे निर्माण केलेली आहेत. राऊत नगर, सुजय नगर, व्यंकट नगर, अशी अनेक उपनगरे प्रस्थापितांनी सोयीनुसार निर्माण केलेली आहेत. स्वतःचे प्लॉटिंग व्यवसाय केलेले आहेत मात्र, पाण्याची कायमस्वरूपी सोय केलेली नाही.
अनेक वर्ष सत्तेत असून सुद्धा प्रस्थापितांनी अकलूजच्या जनतेला पाण्यासाठी वणवण भटकंती करायला लावलेली होती. मात्र, भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने टँकर मार्फत मोफत पाणी वाटप करून सर्वसामान्य व गोरगरीब जनतेला दिलासा देण्याचे काम केलेले होते. तर दुसरीकडे माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, पालकमंत्री जयकुमार गोरे, लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामार्फत पाठपुरावा करून कार्यकारी संचालक श्री. धुमाळ यांच्या माध्यमातून कार्यकारी अभियंता श्री. मोरे यांना तातडीने आदेश देऊन अकलूजच्या पाणी प्रश्नावर तोडगा काढलेला आहे. अखेर अकलूजच्या पाण्याचा प्रश्न त्रिमूर्ती लोकप्रतिनिधी यांची शिष्टाई कामी येऊन टॅंक मध्ये पाणी दाखल झालेले आहे…
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



