कुसमोड येथील दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग दाखला व ओळखपत्र धैर्यशीलजी मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाले प्राप्त
माळशिरस ( बारामती झटका)
मा. धैर्यशीलजी मोहिते पाटील, भाजपा संघटन महामंत्री, यांच्या मार्गदर्शनाखाली सतीश होनमाने, सरचिटणीस भाजपा युवा मोर्चा माळशिरस तालुका, पोपट कचरे ग्राम पंचायत सदस्य, देविदास धायगुडे युवा नेते, अनिल धायगुडे यांनी स्वखर्चाने अपंग व्यक्तींना दाखले व ओळखपत्र मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.
माळशिरस तालुक्यातील कुसमोड येथील अतिशय गरीब असलेल्या सहा अपंग महिला व पुरुष यांना अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये तपासणी होऊन त्यांना अपंग दाखला व ओळखपत्र प्राप्त झाल्यामुळे त्यांना संजय गांधी निराधार योजनेतून प्रति महिना एक हजार रुपये पेन्शन चालू होणार असून त्यांना अपंग दाखला मिळाल्यामुळे इतर शासकीय योजनेचा लाभ घेण्याचे सोयस्कर झाले आहे. तसेच त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होणार आहे. त्यामुळे कुसमोड मधील अपंग व्यक्तीमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यासाठी डॉ. उत्तमराव सरगर (शक्ती केंद्राध्यक्ष, भाजपा), बाळासाहेब धायगुडे ग्रा.सदस्य, महादेव बंडगर, नारायण चव्हाण, रमेश देशमुख, विकास सरगर, पोलिस पाटील, शशिकला लोखंडे, माजी सरपंच चंद्रकांत पवार, दादासाहेब पवार, अरुण पवार, विलास लोखंडे, जगदीश गायकवाड, बाळासाहेब कपने, दिगंबर चौगुले, सुनील बोडरे, बापू बोडरे, नितीन मोरे, अक्षय मोरे, नाबाजी मदने, नितीन लंगरे, काळभोर दादा इत्यादींचे मोलाचे सहकार्य मिळाले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng