आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा – मनसे नेते दिलीप बापू धोत्रे
सर्वसामान्य जनतेच्या पैशातून पगार घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी जनतेची कामे सोडून नेत्यांची हुजरेगिरी सोडा
माळशिरस (बारामती झटका)
सर्वसामान्य जनतेच्या विविध मूलभूत दैनंदिन गरजा, रस्ते, वीज, पाणी, गटारी, अग्निशामक सेवा, बाजार अशा विविध मागण्या घेऊन आज मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस नगरपंचायतीवर भव्य दिव्य असा हलगी नाद मोर्चा काढण्यात आला. यावेळी मनसे माढा लोकसभा अध्यक्ष अप्पासाहेब कर्चे, मनसे नगरसेविका रेश्माताई टेळे, मनसे तालुकाध्यक्ष सुरेश भाऊ टेळे, ॲड. दादासाहेब पांढरे, नगरसेवक कैलास वामन, रशीद भाई शेख, पंढरपूर तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, सांगोला तालुकाध्यक्ष रणसिंह देशमुख, अनिल केदार, बाबा ननवरे, रोहित खाडे, संतोष देवकाते, लक्ष्मण नरुटे, फिरोज शेख, राजाभाऊ रासकर, अजित पवार, मायाप्पा जावळे, सुरेश वाघमोडे, मोहन टेळे, मंगल ताई चव्हाण, शंकर शिंदे, प्रेम देवकाते, दादा भांड, संतोष टेळे, प्रशांत कुचेकर, शंभो वाघमोडे, किरण मोरे, सुभाष नरुटे, नितीन कर्चे, नंदन गायकवाड, अजित जाधव, गोविंद पाटोळे, शुभम जाधव, भारत कर्चे, अजित पांढरे, विजय मदने, लाला जाधव, पप्पू तरंगे, राजू कांबळे, अनिल चव्हाण, उमेश मसुगडे, संभाजी मसुगडे, निलेश मसुगडे, महेश सावंत, संतोष शिंदे, नाना सरगर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना दिलीप बापू धोत्रे म्हणाले की, गेंड्याची कातडी पांघरलेले व झोपेचे सोंग घेतलेले माळशिरस प्रशासनातील अधिकारी यांना जनतेच्या कररुपी पैशातून पगार मिळत असतो. त्यांनी जनतेचीच कामे केली पाहिजेत. पण या नगरपंचायतीमधील अधिकारी जर कोण्या नेत्याचे फोटो स्टेटसला ठेवणे, हुजरेगिरी करणे असे प्रकार करत असतील, सर्वसामान्य जनतेची कामे करणार नसतील तर त्यांनी लवकर खुर्च्या खाली करा, अन्यथा गाठ मनसे बरोबर आहे. जनतेचे एकही विकासकाम तातडीने न करणाऱ्या नगराध्यक्षकांना चार पुरस्कार देणाऱ्या लोकांनाच आता पुरस्कार देण्याची वेळ आली आहे. तरी लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य करा.
मागण्या पुढीलप्रमाणे –
१. माळशिरस नगरपंचायतीकडे स्वतःच्या मालकीचे अग्निशामक गाडी लवकर उपलब्ध करणे.
२. घनकचऱ्यातील होत असलेल्या भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करावी. टेंडर मधील नियमानुसार कर्मचारी उपलब्ध होत नाहीत. तसेच गावातील स्वच्छता दैनंदिन होत नाही. गावांमधील मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य झालेले आहे. तसेच गोळा केलेला कचरा हा तसाच ढीग लावून गावांमध्ये ठेवला जातो. उचलला जात नाही. गावातील गटारी स्वच्छ नाहीत.
३. नवीन घरकुल योजना लवकर सुरू करण्यात याव्यात. तसेच यापूर्वी घरकुलधारकांचे राहिलेले हप्ते पूर्ण करण्यात यावे.
४. माळशिरस शहरासाठी दैनंदिन स्वच्छ पाणीपुरवठा करण्यात यावा.
५. बाजार व मंडईचा कर गोळा करण्याचा लिलाव लवकर काढण्यात यावा.
६. महिला व बालकल्याण विभागास निधी लवकर उपलब्ध करण्यात यावा.
७. माळशिरस शहरातील दिव्यांगास निधी लवकर वाटप करण्यात यावा.
८. माळशिरस शहरामध्ये प्रत्येक चौकामध्ये मुतारीची सोय करण्यात यावी.
९. माळशिरस नगरपंचायत हद्दीतील स्ट्रीट लाईट ही दिवसभर चालू राहते, तरी सदर लाईट दिवसा बंद करण्यासाठी वैयक्तिक कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी.
या सर्व मागण्या मान्य झाल्या नाही तर, जिल्हाधिकारी व आयुक्त कार्यालयावर याहीपेक्षा मोठा मोर्चा काढू.
या आंदोलनास प्रहार संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
It’s very interesting! If you need help, look here: hitman agency
It’s very interesting! If you need help, look here: hitman agency