कारूंडे येथे चैतन्य जप प्रकल्पाचे २२ वे राज्यस्तरीय शिबिर होणार
भाग्यवान जपकार श्री. व सौ. सुशीला महादेव पवार यांच्या शुभहस्ते तर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, आ. राम सातपुते, आ. दीपकजी चव्हाण, यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार संपन्न
कारूंडे (बारामती झटका)
चैतन्य जप प्रकल्पाचे २२ वे राज्यस्तरीय शिबिर दि. १२ आणि १३ नोव्हेंबर २०२२ रोजी श्री ब्रह्मचैतन्यनगरी, लोंढे वस्ती (कारूंडे) जि. सोलापूर येथे संपन्न होत आहे. या शिबिराचे उद्घाटन भाग्यवान जपकार श्री. व सौ. सुशीला महादेव पवार भवानीनगर, राजुरी यांच्या शुभहस्ते तर शंकरवेदांताचार्य प. पू. श्री. शिवानंदजी भारती महाराज श्री शिवधाम अंभेरी, ता. खटाव, जि. सातारा यांच्या आशीर्वचनाने संपन्न होणार आहे. तर यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे सदस्य आ. राम सातपुते, फलटण विधानसभा मतदार संघाचे सदस्य आ. दीपकजी चव्हाण हे असणार आहे.
शुक्रवार दि. ११ नोव्हेंबर रोजी सायं. ६ ते ७ श्रीं ची प्रतिष्ठापना आरती व सत्संग तर सायं. ७ ते ९ ह. भ. प. श्री. राजेंद्र महाराज मोरे यांचे सांप्रदायिक कीर्तन तसेच रात्री ९ ते १० भोजन आणि ९.३० ते १०.३० चैतन्य जप प्रकल्प सेवेकरांची बैठक असणार आहे.


शनिवार दि. १२ नोव्हेंबर रोजी पहाटे ५ ते ६.३० श्रीं ची काकड आरती, सकाळी ६ वाजता अखंड जपमाळेस प्रारंभ होणार आहे तर ८.३० ते १०.२० पर्यंत श्रीं ची शोभायात्रा व पालखी मिरवणूक असणार आहे. सायं. ४ ते ६ ह. भ. प. श्री. संदीपबुवा मांडके, पुणे यांचे नारदीय कीर्तन होणार आहे. तसेच ७ ते ७.३० अध्यात्मिक सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. रात्री ८.४५ ते ९ पर्यंत सामुदायिक नामस्मरण, ९ ते १० अध्यात्मिक सांस्कृतिक कार्यक्रम, रात्री १० ते ११ श्री ब्रह्मचैतन्य भजनी मंडळ नातेपुते आणि रात्री ११ ते १२ श्री ब्रह्मचैतन्य भजनी मंडळ घाडगेवाडी यांची भजन सेवा होणार आहे.
रविवार दि. १३ नोव्हेंबर रोजी पहाटे ५ ते ६.१५ श्रीं ची काकड आरती, ६.१५ ते ७ प्रा. राजेंद्र आगवणे, कांबळेश्वर आणि ७.१५ ते ८ श्री. गणपतराव जगताप, बारामती यांची प्रवचन सेवा होणार आहे. सकाळी ९ वा. रक्तदान शिबिराचे उद्घाटन फलटण तालुका दूध संघाचे अध्यक्ष धनंजय पवार यांच्या शुभहस्ते होणार आहे. तर कारुंडे ग्रामपंचायतचे माजी सरपंच अमर जगताप आणि सरपंच अमोल पाटील यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात येणार आहे. दुपारी ३.३० ते ३.४५ शिबिर सांगता समारंभ ह.भ.प. डॉ. श्री. लक्ष्मण आसबे इंदापूर यांच्या प्रमुख उपस्थितीत तर नंदकुमार जोशी पुणे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. त्यानंतर ४.४५ ते ५ अखंड माळ सांगता श्रीं ची आरती व पसायदान होणार आहे.

तरी सर्व भाविक भक्तांनी या शिबिरास मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री महाराजांच्या सेवेचा व कृपा प्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन चैतन्य जप प्रकल्पाचे कार्याध्यक्ष व शिबिर प्रमुख धैर्यशील भाऊ देशमुख, अर्जुन काटे सेवेकरी, जप संकुल शाखा लोंढेवस्ती (कारूंडे), ज्ञानेश्वर लावंड सेवेकरी, जप संकुल शाखा कारूंडे, हनुमंत पाटील सचिव, २२ वे राज्यस्तरीय शिबिर, राजेंद्र महाराज मोरे स्थानिक शिबिर प्रमुख २२ वे राज्यस्तरीय शिबिर यांच्यावतीने करण्यात आले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

