सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या योजनांचा शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा – व्ही. व्ही. डोके
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते आणि सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रशासकीय सदस्य व्ही. व्ही. डोके यांच्या उपस्थितीत स्थलांतर कार्यक्रम संपन्न…
वाघोली ( बारामती झटका)
दि. 21 नोव्हेंबर रोजी वाघोली तालुका माळशिरस येथील शाखा वाघोली स्थलांतरांचा कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री श्री. विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. सदर वेळी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रशासकीय सदस्य श्री. व्ही. व्ही. डोके यांनी वरील मनोगत व्यक्त केले.
वाघोली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित वाघोली या संस्थेच्या इमारतीचा नुकताच विस्तार करण्यात आला असून जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या कार्यालयात स्थलांतरित दि. 21 रोजी करण्यात आली. सदर कार्यक्रमावेळी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कामकाजाचा आढावा व्यवस्थापक श्री. आर. एन. जाधव साहेब यांनी सांगितला. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सोलापूर जिल्ह्यात सर्वत्र शाखा असून सर्व जिल्ह्यात माळशिरस तालुका वसुलीच्या बाबतीत आघाडीवर असून शेतकऱ्यांसाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेने ज्या ज्या नवीन योजना राबवत आहे त्या योजनांचा सर्वस्वी लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आव्हान या ठिकाणी व्यवस्थापक श्री. आर. एन. जाधव साहेब यांनी केले.
वाघोली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या वतीने 15 लाख रुपये खर्च करून इमारत व संस्थेच्या कार्यालयाचे बांधकाम केले आहे. आजपर्यंत जिल्हा मध्यवर्ती बँकेची वाघोली शाखा ग्रामपंचायतीच्या इमारतीत कामकाज करीत होती. विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या इमारतीचे काम पूर्ण केल्यानंतर सदरच्या शाखेचे स्थलांतरांचा कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री श्री. विजयसिंह शंकररावजी मोहिते पाटील, प्रशासकीय सदस्य मा. श्री. डोके साहेब, व्यवस्थापक आर. एन. जाधव साहेब, पंचायत समिती माळशिरसचे माजी सदस्य सूर्यकांत शेंडगे, मराठा सेवा संघाचे पुणे विभागीय अध्यक्ष उत्तमराव माने शेंडगे, वाघोली गावच्या प्रथम नागरिक सौ. वृषाली योगेश माने शेंडगे, ग्रामपंचायत उपसरपंच पंडित मिसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंचायत समिती माळशिरसचे माजी सदस्य सूर्यकांत माने शेंडगे यांनी केले. त्यात त्यांनी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या कामकाजाचा आढावा प्रमुख पाहुण्यांच्या समोर सादर केला व गावच्या विविध कामाअंतर्गत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्याकडे निधीची मागणी केली.
सदर कार्यक्रमावेळी ग्रामपंचायतचे सदस्य योगेश माने यांनी गावच्या विकासासाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना गावाच्या विकासकामासाठी निधी देण्यास सहकार्य करण्याचे आवाहन केले व तसे निवेदन दिले.
सदर कार्यक्रमावेळी राज्याचे नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचा वि. का. वि. संस्थेच्या वतीने चेअरमन अशोक चव्हाण व व्हा. चेअरमन रामचंद्र मिसाळ यांनी सत्कार केला. तसेच विविध संस्थांच्या वतीने उपसरपंच पंडित मिसाळ, पतसंस्थेचे चेअरमन दिगंबर माने, संचालक भगवान गणपत मिसाळ यांनी यथोचित सन्मान केला.
सदर कार्यक्रमास पुणे विभागीय मराठा सेवा संघाचे अध्यक्ष उत्तमराव माने शेंडगे, माजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, ग्रामपंचायतच्या सरपंच सौ. वृषाली माने शेंडगे, उपसरपंच पंडित मिसाळ, सहकार महर्षी कारखाने संचालक सतीश शेंडगे, शंकर सहकारी साखर कारखाने संचालक भगवानराव मिसाळ, संगमचे केशवराव ताटे, नारायणराव ताटे, श्री. व्ही. व्ही. डोके साहेब, व्यवस्थापक श्री. आर. एन. जाधव साहेब, आप्पासाहेब गायकवाड, अशपाक मुलाणी, वाघोली, वाफेगाव, बाभूळगाव पंचक्रोशीतील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन, व्हॉइस चेअरमन, सर्व संचालक आदिंसह रवींद्र इनामदार साहेब, वाघोली ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, विविध कार्यकारी सेवा, सर्व संचालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माळशिरस तालुका संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष दिगंबर मिसाळ यांनी करून आभार संस्थेचे चेअरमन अशोक चंद्रकांत चव्हाण यांनी मानले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Very informative article! I appreciate the depth of analysis. If you want to delve deeper, here’s a helpful resource: EXPLORE FURTHER. Eager to hear everyone’s thoughts!
[url=http://linkstoronionurls.com]http://linkstoronionurls.com[/url]