संभाजी ब्रिगेडच्या वतीने टेंभुर्णी येथे भव्य नोकरी मेळावा संपन्न
टेंभुर्णी (बारामती झटका)
दि. २५ नोव्हेंबर रोजी संभाजी ब्रिगेड सोलापूर जिल्ह्याच्या वतीने टेंभुर्णी एमआयडीसी येथे नोकरी मेळावा पार पडला. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवश्री सचिन बापू जगताप यांनी आयोजित केलेल्या नोकरी मेळाव्यासाठी संभाजी ब्रिगेड प्रदेश सहसंघटक इंजि. मनोजकुमार गायकवाड हे प्रमुख उद्घाटक म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक म्हणून बोलताना इंजि. मनोजकुमार गायकवाड म्हणाले की, संपूर्ण राज्यात आणि देशात तरुणांमध्ये बेरोजगारी वाढत असताना संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून होत असलेला हा नोकरी मेळावा म्हणजे तरुणांसाठी एक संधीच आहे. येणाऱ्या काळात संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून सबंध राज्यभरात तरुण तरुणींसाठी भव्य प्रमाणात नोकरी मेळावे तसेच बिझनेस कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन इंजि. मनोजकुमार गायकवाड यांनी केले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे पुणे विभागीय अध्यक्ष शिवश्री किरणराज घाडगे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब पाटील, इक्विटास ट्रस्टचे मॅनेजर संग्राम पाटील, टेंभुर्णी एमआयडीसी असो.चे संस्थापक अमोलशेठ जगदाळे, अध्यक्ष राजाभाऊ ढेकणे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.


यावेळी उद्योजक गोरख खटके सर, मयुर काळे, राजू येवले, किरण पराडे-पाटील, संतोष ढवळे, मराठा सेवा संघाचे अरुण जगताप, विजय काळे, संभाजी ब्रिगेडचे शिवश्री गणेश शिंदे – पुणे विभागीय संघटक, शिवश्री बालाजी जगताप – मा.तालुकाध्यक्ष , शिवश्री दिगंबर मिसाळ – तालुकाध्यक्ष माळशिरस, शिवश्री बाळासाहेब बागल – तालुकाध्यक्ष पंढरपूर, शिवश्री सचिन खुळे – शहराध्यक्ष टेंभुर्णी, किरण कचरे – ता. उपाध्यक्ष, शिवश्री सचिन पराडे – ता. उपाध्यक्ष, शिवश्री भारत लटके – ता. कार्याध्यक्ष, शिवश्री अविनाश पाटील – ता. उपाध्यक्ष, शिवश्री बाळासाहेब वागज – ता. संघटक, शिवश्री नितीन मुळे – ता. संघटक, शिवश्री श्रीकांत गायकवाड – कूर्डू विभागप्रमुख, शिवश्री शंकर उबाळे – ग्रा. पं. सदस्य चिंचगाव, शिवश्री शंकर नागणे – तालुकाध्यक्ष वि. आ., शिवश्री अजय गायकवाड – तालुकाध्यक्ष का. आ., शिवश्री किरण जाधव – ता. उपाध्यक्ष वि. आ., शिवश्री नानासाहेब कौलगे – शाखाप्रमुख परिते, शिवश्री अविनाश जगताप, माऊली कचरे, योगेश मुळे – शहर उपाध्यक्ष, रोहीत मोरे, गणेश भोसले, गणेश जगताप – शाखाप्रमुख सापटणे (टें.), दादासाहेब मुळे, रियाज मुलाणी, शिवश्री अविनाश इंदलकर, शिवश्री अविनाश नांगरे, शिवश्री गणेश गोंदिल, शिवश्री वैभव पवार, शिवश्री केशव पवार, समाधान जाधव आदी उपस्थित होते.


या नोकरी मेळाव्यात राज्यभरातून जवळपास ५० विविध कंपन्यांचे प्रतिनिधी आणि जिल्ह्यातून जवळपास ४५० इच्छुक उमेदवारांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवश्री दिगंबर मिसाळ तर आभार प्रदर्शन शिवश्री बाळासाहेब बागल यांनी केले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

