Uncategorizedताज्या बातम्या
उंबरे दहिगाव येथे ह.भ.प. डॉ. जयवंत महाराज बोधले, धामणगावकर यांचे सुश्राव्य कीर्तन होणार
कै. रामचंद्र तुळशीराम वाघमोडे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त किर्तन, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन
उंबरे दहिगाव (बारामती झटका)
उंबरे दहिगाव येथे कै. रामचंद्र (बापू) तुळशीराम वाघमोडे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त संत माणकोजी महाराज बोधले यांचे वंशज कीर्तनकार ह.भ.प. डॉ. जयवंत महाराज बोधले धामणगावकर, पंढरपूर यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन शनिवार दि. २४/९/२०२२ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेमध्ये करण्यात आले आहे.

त्यानंतर दुपारी १२ वा. फुलांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्व स्वकीय, आप्तेष्ट, मित्रपरिवार यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन, समस्त वाघमोडे परिवार यांच्यावतीने करण्यात आले आहे.


नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
