मूकबधीर रोहीत अपंगत्वावर मात करुन कारागीरीतून बनला दुकान मालक
पिलीव ( बारामती झटका रघुनाथ देवकर यांजकडून)
पिलीव ता. माळशिरस येथील नामदेवसिंग ज्ञानुसिंग भैस यांचा नातु रोहीत सचिन भैस हा युवक जन्मताच मूकबधीर असून बालपणापासूनच त्याला इलेक्ट्रिक वस्तूंचा छंद ,बॅटरी ,रेडीओ दुरुस्ती करणे,फिटींग अशा कामातुन जेमतेम चौथीपर्यंत शिक्षण घेत एका मोटारसायकल गॅरेजमध्ये कामगार म्हणून मोटारसायकल दुरुस्ती चे काम शिकू लागला.घरची जेमतेम परिस्थिती अशा परिस्थितीत त्याने अपंग असूनही जिद्द न सोडता काम करु लागला त्यांच्या दुकान मालकाने ही त्यांची जिद्द पाहुन त्याला प्रोत्साहन देऊन पाठीवरती शाबासकीची थाप देत त्याला त्याचा मेहताना देऊन काम शिकविले.सदर रोहीत ने मिळणारा पगार बचतगटात गुंतवत म्हणजे खाजगीस्वरूपात बचतीची सवय लाऊन कामात आपली कला दाखवत उत्कृष्ट कामगार बनला व मालकाबरोबरच गिऱ्हाईकांचाही आवडता कलाकार झाला.मूकबधीर असूनही मालकाला, घरच्यांना आपल्या खानाखुनांनी मालक बनविण्याची इच्छा दाखविली त्याला संमती मिळाल्यावर स्वतः केलेल्या बचतीतून मोटारसायकल गॅरेजचे साहित्य खरेदी करून सातारा -सोलापूर महामार्गावर “रोहित हार्डवेअर्स” या नांवे आपल्या धाकट्या भावाला हाताखाली घेऊन आजच्या धडधाकट तरुणाईला लाजवेल अशाप्रकारे बॅंक आॅफ इंडिया शाखेच्या समोर भाडोत्री गाळा घेऊन मुकबधीर रोहीत मालक बनून उत्कृष्ट कारागिर म्हणुन आपली कला दाखवत अपंगत्वावर मात करुन जिद्द,कष्टावर स्वाभिमानाने जगू शकतो हे दाखवून देत आहे. त्याच्या कर्तृत्वाने अनेकजण त्याचे कौतुक करीत आपुलकीने पाहत आहेत पिलीव व पंचक्रोशीत त्यांच्या जिद्दीची व कलेची वाहवा केली जात आहे. सदर रोहितला आजोबा नामदेवसिंग भैस व मा सरपंच लक्ष्मण भैस यांचे प्रोत्साहन मिळत असल्याचे समजते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng