Uncategorizedताज्या बातम्या

माळशिरस नगरपंचायतच्या वतीने दिव्यांग कल्याण कार्यशाळा संपन्न

माळशिरस नगरपंचायत दिव्यांग बांधवांसाठी त्यांच्या सेवेसाठी व मदतीसाठी सर्वतोपरी कटिबद्ध आहे – नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख

माळशिरस (बारामती झटका)

माळशिरस नगरपंचायतच्या वतीने दि. १४/१२/२०२२ रोजी दिव्यांग कल्याण कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये दिव्यांगासाठी कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली व दिव्यांग बंधू भगिनींच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष पद माळशिरस नगरपंचायतचे नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख यांनी भूषविले. या कार्यक्रमाची प्रस्ताविका नगरपंचायतीच्या कार्यालय अधीक्षक भाग्यश्री बेडगे यांनी केली व शासनाच्या दिव्यांगासाठी असलेल्या अनेक योजनांची माहिती दिली व लाभ घेण्यासाठी आवाहन केले.

त्यानंतर माळशिरस नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी नितीन गाढवे यांनी माळशिरस नगरपंचायतीकडून राबविल्या जाणाऱ्या योजना व निधी वाटपाबद्दल माहिती दिली व दिव्यांग बंधू भगिनींना माळशिरस नगरपंचायतीच्या घरकुल योजना, वैयक्तिक दिव्यांग थेट कर्ज योजना, दिव्यांग शैक्षणिक कर्ज योजना, मुदत दिव्यांग कर्ज योजना, व महिला समृद्धी कर्ज योजना यामध्ये सहभागी करून घेण्याबाबत आश्वासन दिले. तसेच माळशिरस नगरपंचायतीचा शहर विकास आराखडा तयार झाल्यानंतर शासकीय जागा दिव्यांग बंधू-भगिनींना राहण्यासाठी व व्यवसायासाठी आरक्षित करण्यात येतील, असे सांगितले.

त्यानंतर माळशिरस नगरपंचायतीचे नगराध्यक्ष तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख यांनी अध्यक्षीय भाषणात दिव्यांग बांधवांना संबोधित केले. माळशिरस नगरपंचायत दिव्यांग बांधवांसाठी त्यांच्या सेवेसाठी व मदतीसाठी सर्वतोपरी कटिबद्ध आहे व दिव्यांगासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा सर्वांनी लाभ घ्यावा व सक्षम आणि सुजाण नागरिक बनावे. तसेच निर्भयपणे स्वावलंबी जीवन जगावे असे सांगितले. यावेळी माळशिरस नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष शिवाजी देशमुख, नगरसेविका ताई वावरे, नगरसेवक विजय देशमुख, नगरसेवक रघुनाथ चव्हाण, अजिनाथ वळकुंदे, पांडुरंग वाघमोडे, माळशिरस नगरपंचायतचे कर्मचारी व माळशिरस नगरपंचायत हद्दीतील सर्व दिव्यांग बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button