सत्यजित तांबेना भाजपचा पाठिंबा?
अहमदनगर ( बारामती झटका)
विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीत नाशिक पदवीधर मतदारसंघ केंद्रस्थानी आलेला आहे. या निवडणुकीत सत्यजित तांबे यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेला आहे.
परंतु, आता उत्तर महाराष्ट्रातल्या भाजप नेत्यांचा सत्यजित तांबे यांना पाठिंबा मिळताना दिसत आहे. याबाबबत भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सत्यजित तांबेंना मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे.
सत्यजित तांबे तरुण आणि होतकरू आहेत. त्यांना संधी मिळाली पाहिजे, त्यामुळे आमच्या स्तरावरील कार्यकर्त्यांनी सत्यजित तांबे यांना मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या तरुणाईचं युग आहे, सत्यजित तांबे हे तरुण असून, ते आपली भूमिका समर्थपणे मांडू शकतात. कार्यकर्त्यांनी सत्यजित तांबे यांचं काम करण्यास सुरुवात केली आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng