युवानेते प्रेमभैय्या देवकाते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेली डान्स स्पर्धा उत्साहात संपन्न
नातेपुते (बारामती झटका)
नातेपुते नगरीचे युवानेते प्रेमभैया देवकाते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त एक दिवसीय भव्य डान्स स्पर्धेचे आयोजन प्रेमभैया देवकाते पाटील युवा मंच आणि गौतम शेठ पांढरे पाटील मित्र परिवार यांच्यावतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीत लोकप्रिय दमदार आमदार रामभाऊ सातपुते उपस्थित होते. तसेच माजी पोलीस पाटील समाजरत्न राजेंद्रभाऊ पाटील, नगरसेवक ॲड. बी. वाय. राऊत, नगरसेवक राजेंद्र दादासाहेब उराडे, पंचायत समिती सदस्य माऊली पाटील, नगरसेवक दीपक (आबा) काळे, नगरसेविका शर्मिला चांगण, नगरसेविका माया उराडे, नगरसेवक बांधकाम सभापती अतुल (बापू) पाटील, नगरसेवक अण्णा पांढरे, नगरसेवक रावसाहेब पांढरे, नगरसेवक शशी बरडकर, नगरसेवक रणजीत पांढरे, माळशिरस तालुका मनसे अध्यक्ष सुरेश (भाऊ) टेळे, सचिन तात्या देशमुख, माजी ग्रामपंचायत सदस्य संदीपदादा ठोंबरे, डॉ. नरेंद्र कवितके, उद्योजक राहुलशेठ पद्मन, राहुलभाऊ रुपनवर, उद्योजक अतुलशेठ बावकर, सामाजिक कार्यकर्ते सागर बिचुकले, पै. सोमा जाधव, अध्यक्ष विठ्ठल ठोंबरे, अजित बाविस्कर, बाबासाहेब साळवे, सावता बोराटे, अमर सोरटे, गणेश कुचेकर, रवी भाळे आदी मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सोलो डान्स स्पर्धेसाठी ३१ स्पर्धक तर ग्रुप डान्स स्पर्धेसाठी १६ संघ आले होते.
यावेळी घेण्यात आलेल्या भव्यदिव्य डान्स स्पर्धेमध्ये सोलो गटातून शिवकन्या तोडकर, पंढरपूर आणि सृष्टी जाधव, सातारा यांना प्रथम क्रमांक विभागून देण्यात आला आहे. तसेच श्रेया म्हात्रे अलिबाग आणि कोमल पवार, इचलकरंजी यांना देखील द्वितीय क्रमांक विभागून देण्यात आला आहे. तसेच मनोज जगताप, अकलूज आणि पलक मेहता, फलटण यांना तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला आहे.

ग्रुप डान्स स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक साई प्रेरणा कला मंच अलिबाग यांना मिळाला आहे. तर द्वितीय क्रमांक डीडीएस ग्रुप पंढरपूर आणि तृतीय क्रमांक एस ग्रुप कोल्हापूर यांना मिळाला आहे. सदर स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून बुद्धभूषण साळवे, नातेपुते, डॉ.पंकज पवार, बार्शी, सौ. आम्रपाली गायकवाड, सोलापूर यांनी काम पहिले. यावेळी विजेत्यांचे पारितोषिक आणि ट्रॉफी देवून अभिनंदन करण्यात आले.
युवानेते प्रेमभैया देवकाते पाटील यांच्यावर वाढदिवसानिमित्त सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सामाजिक, राजकीय, शासकीय अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या शुभेच्या दिल्या आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng