गुरसाळे येथील सौ. मृदुला संजय कोरटकर यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन..
राष्ट्रीय ॲग्रो केमिकल इंडस्ट्रीचे मॅनेजिंग डायरेक्टर व श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री. संजय कोरटकर यांना पत्नीशोक..
नातेपुते ( बारामती झटका)
गुरसाळे ता. माळशिरस येथील सौ. मृदुला संजय कोरटकर यांचे अल्पशा आजाराने मंगळवार दि. 28/2/2022 रोजी पहाटे दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात सासू, पती, एक मुलगा, एक मुलगी, सून व नातू असा परिवार आहे. राष्ट्रीय केमिकल्स इंडस्ट्रीचे मॅनेजिंग डायरेक्टर व श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री. संजय दत्तात्रेय कोरटकर यांच्या त्या धर्म पत्नी होत्या. स्व.सौ. मृदुला कोरटकर धार्मिक वृत्तीच्या असल्याने सौभाग्य मरण आले आहे. त्यांच्यावर नातेपुते येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत. रक्षा विसर्जन तिसऱ्याचा कार्यक्रम गुरुवार दि. 02/03/2023 रोजी सकाळी 08 वाजता होणार आहे.
श्री. संजय कोरटकर यांचे मूळ गाव गुरसाळे आहे. सध्या ते वास्तव्यास नातेपुते येथे आहेत. त्यामुळे नातेपुते येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत. गुरसाळे व नातेपुते गावावर शोककळा पसरलेली आहे.
स्व. सौ. मृदुलाताई यांच्या मृतात्म्यास शांती लाभो व कोरटकर परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो, हीच बारामती झटका परिवार यांचेकडून भावपूर्ण आदरांजली !!!
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng