भुताष्टे येथे सनशाईन इंग्लिश मीडियम स्कूल आयोजित आरोग्य शिबिर आणि तालुकास्तरीय नृत्य स्पर्धा #सनशाईन इंग्लिश मीडियम स्कूल #पाटीलवस्ती
पाटीलवस्ती (बारामती झटका)
श्री संत कुर्मदास बहुउद्देशीय सामाजिक संस्था संचलित सनशाईन इंग्लिश मीडियम स्कूल, पाटीलवस्ती भूताष्टे आयोजित भव्य आरोग्य शिबिर व तालुकास्तरीय नृत्य स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष कल्याण यादव व सचिव डॉ. महेश यादव होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून पडसाळी गावचे प्रताप पाटील, जळोली गावचे मोहन नरसाळे पाटील, सामजिक कार्यकर्ते सागर यादव, बावी गावचे गाडे सर, सोमनाथ यादव, कला शिक्षक अतुल यादव सर तसेच इतर सर्व पालक वर्ग उपस्थित होते.
मागील सात वर्षापासून होत आलेल्या या कार्यक्रमांमध्ये आरोग्य शिबिरात बुधरानी हॉस्पिटल पुणे, डॉ. अमित व्यवहारे, डॉ. लूनावत मॅडम, डॉ. कोल्हे मॅडम यांचे योगदान लाभले. या शिबिरामध्ये जवळजवळ २५० रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले.
तसेच नृत्य स्पर्धेमध्ये २०० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. या कार्यक्रमासाठी व्यवहारे मॅडम, गुंड मॅडम, पताळे मॅडम तसेच बेरड बंधू यांचे सहकार्य लाभले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाळ कसबे यांनी केले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng