येळीव गावच्या शिरपेचामध्ये कु. राजश्री रामचंद्र निंबाळकर हिने मानाचा तुरा रोवला… #राजश्री रामचंद्र निंबाळकर #कॉस्ट मॅनेजमेंट अकाउंटंट
कॉस्ट मॅनेजमेंट अकाउंटंट (CMA) परीक्षेत दैदीप्यमान यश संपादन करून गावात पहिल्यांदाच मुलींमध्ये यश संपादन केलेले आहे.
येळीव (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील येळीव गावची सुकन्या कुमारी राजश्री रामचंद्र निंबाळकर हिने कॉस्ट मॅनेजमेंट अकाउंटंट (CMA) परीक्षेत दैदीप्यमान यश संपादन करून येळीव गावच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा रोवला आहे. कास्ट मॅनेजमेंट अकाउंटंट परीक्षेत दैदीप्यमान यश संपादन करून गावात पहिल्यांदाच मुलींमध्ये यश संपादन केलेले आहे. राजश्रीच्या यशाबद्दल कौतुक केले जात आहे.

कुमारी राजश्री निंबाळकर हिचे पहिली ते चौथी प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पुरंदावडे येथे झालेले आहे. पाचवी ते बारावी पर्यंत कर्मवीर बाबासाहेब विद्यालय सदाशिवनगर येथे झालेले आहे. बीकॉम व कॉस्ट मॅनेजमेंट अकाउंटंट बारामती येथील तुळजाराम चतुरचंद कॉलेज (टीसी कॉलेज) येथे झालेले आहे. बीकॉम २०२० साली सर कॉस्ट मॅनेजमेंट अकाउंटंट २०२२ मध्ये उत्तीर्ण झालेली आहे.
सौ. संगीता व श्री. रामचंद्र अनंता निंबाळकर यांना राजश्री आणि श्रीकृष्ण अशी दोन अपत्य आहेत. श्रीकृष्ण आयसीसी बँक गोवा येथे मॅनेजर आहे. श्रीरामचंद्र निंबाळकर व्यंकटेश कृपा शुगर पुणे येथील साखर कारखान्यात नोकरीस आहेत. कुमारी राजश्री हिला वेळोवेळी किरण ज्ञानदेव निंबाळकर. यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे. घरामध्ये आजी श्रीमती शालन अनंता निंबाळकर यांना आपल्या नातीने दैदीप्यमान यश संपादन करून गावांमध्ये पहिल्यांदाच मुलगी ऑफिसर होत आहे, याचा अभिमान वाटत आहे.
कुमारी राजश्री निंबाळकर हिच्या यशाबद्दल मित्रपरिवार व नातेवाईक यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng