शिवतेजसिंह मोहिते पाटील यांची ज्येष्ठ नेते गणपततात्या वाघमोडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट….
माळशिरस (बारामती झटका)
आशिया खंडातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतचे माजी सरपंच शिवरत्न उद्योग समूहाचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर शिवतेसिंह उदयसिंह मोहिते पाटील यांनी भांबूर्डी, ता. माळशिरस, येथील अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती जेष्ठनेते गणपततात्या वाघमोडे यांच्या चाहूर वस्ती येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. त्यावेळेस शंकरराव मोहिते पाटील सूतगिरणीचे चेअरमन आप्पासाहेब काळे, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक भीमराव काळे, श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक दत्तात्रय रणवरे, इनामदार व अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शिवतेजसिंह मोहिते पाटील यांचा सन्मान वाघमोडे परिवाराच्यावतीने ज्येष्ठनेते गणपततात्या वाघमोडे यांनी केला. यावेळी वाघमोडे परिवारातील अनेक सदस्य उपस्थित होते.

सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील व उद्योग महर्षी उदयसिंह यांच्या विचाराचा वारसा पुढे नेऊन महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व विधान परिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली शिवतेजसिंह मोहिते पाटील यांची राजकीय वाटचाल सुरू आहे. सहकार महर्षींच्या तिसऱ्या पिढीतील शिवतेजसिंह मोहिते पाटील उर्फ शिवबाबा सर्वात लहान आहेत. मात्र, सहकार महर्षींचे विचार त्यांच्यामध्ये रुजलेले आहेत. ते आवर्जून जुन्या नेत्यांच्या घरी जात असतात. कमी वयामध्ये पोक्तपणा असलेले शिवबाबा यांच्या आचार विचार व कार्यावर सर्वसामान्य जनता समाधानी असते. ते भांबुर्डी गावचे ग्रामदैवत श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त दर्शनासाठी आलेले होते. त्यावेळेस आवर्जून ज्येष्ठनेते गणपततात्या वाघमोडे यांच्या निवासस्थानी त्यांनी सदिच्छा भेट दिली.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng