वेळापुरात सकल हिंदू समाजाच्यावतीने सरपंच व ग्रामसेवकांना निवेदन

खंडोबा मंदिर परिसरात होणाऱे अतिक्रमण थांबवण्याबाबत निवेदन
वेळापूर (बारामती झटका)
वेळापूर ता. माळशिरस, येथे सकल हिंदू समाज वेळापूर यांच्यावतीने वेळापूर येथील खंडोबा मंदिर बस स्टँड परिसरात होणारे अतिक्रमण थांबवण्याबाबत वेळापूर ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांना निवेदन देण्यात आले आहे.

सदर निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, पुणे-पंढरपूर पालखी महामार्गाचे काम सुरू असून वेळापूरमध्ये महामार्गामुळे बाधित झालेले महामार्गालगत असणारे सर्व छोटे मोठे व्यावसायिक यांची दुकाने हटवण्यात आली आहे. त्यातील मुस्लिम समाजाच्या व्यावसायिकांनी हिंदूंचे दैवत खंडोबा मंदिर परिसरात अतिक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. सदर मुस्लिम व्यवसायिकांनी सोहेल पंक्चर अँड वेल्डिंग वर्क्स हॉटेल जस्मिन अशा नावांची दुकाने खंडोबा मंदिर परिसरात टाकण्यास सुरुवात केली आहे. तो परिसर खंडोबा मंदिर ट्रस्ट व महाराष्ट्र शासनाच्या मालकीचा आहे.
तरी, खंडोबा मंदिर परिसरात कोणत्याही मुस्लिम व्यावसायिकांनी आपले दुकान टाकून अतिक्रमण करण्यापासून त्यांना रोखण्यात यावे, तसेच सामाजिक सलोखा राखण्यात यावा आणि खंडोबा मंदिर परिसरातील पावित्र्य अबाधित ठेवावे, अशी विनंती या निवेदनात सकल हिंदू समाज वेळापूर यांच्या वतीने करण्यात आली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.