अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चारचाकी गाडीत बसून फिरताना कोण दिसणार…
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आचारसंहितेत स्थिरावलेली गाडी कोण फिरवणार ?
धवलनगर ( बारामती झटका )
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. १८ जागांसाठी ३६ उमेदवार समोरासमोर निवडणुकीसाठी उभे आहेत. निवडणूक सुरू असल्याने निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थिरावलेली चारचाकी गाडी कोण फिरवणार ? असा सवाल उपस्थित होत असताना अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या MH 45 AD 5000 चार चाकी गाडीत बसून राजू निकाळजे, विकास शिंदे, निवृत्ती भुसारे, अमोल पनासे, मिनीनाथ मगर, अमर मगर, समाधान काळे, आहील पठाण, दादासाहेब वाघंबरे असे नेते मंडळींचे कार्यकर्ते फिरतील ,असा आशावाद मतदारांमधून व्यक्त केला जात आहे.
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी मोहिते पाटील गटाच्या विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना या सर्व समविचारी नेत्यांनी एकत्र येऊन सत्ताधारी गटाला मोठे आव्हान उभे केलेले आहे. ग्रामपंचायत मतदार संघातील ४ जागा व सहकारी संस्था गटातील ११ जागा व हमाल तोलार १ जागा अशा १६ जागांवर रस्सीखेच असून विरोधी समविचारी नेत्यांनी गनिमी काव्याने प्रचार यंत्रणा राबवली असल्याने सत्ता परिवर्तन अटळ असल्याचे मतदार व राजकीय विश्लेषकांमधून बोलले जात असल्याने अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आचारसंहितेत स्थिरावलेल्या चार चाकी गाडीत नेत्यांचे कार्यकर्ते फिरताना दिसतील ? अशी तालुक्यात चर्चा सुरू आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng