रिटेवाडी व केतुर दोन उपसा सिंचन योजना मार्गी लावण्याचा मार्ग मोकळा, जलसंपदा विभागाने दिला सकारात्मक अहवाल!!!
प्रकल्पासाठी शासन सकारात्मक, आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांनी घेतला पुढाकार, जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांची माहिती
करमाळा (बारामती झटका)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे रेटेवाडी उपसासिंचन योजना सुरू करण्याची मागणी जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केली होती. या निवेदनाची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाचा अहवाल तयार करण्याचे आदेश कुकडी प्रकल्पांच्या अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार प्रकल्प अधिकारी श्वेता पाटील यांनी आपला अहवाल सादर केला आहे.
उजनी धरणात कुकडी प्रकल्पातून वाहून येणारे चार टीएमसी पाणी करमाळा तालुक्याला देण्यास शक्य आहे, असा अहवाल दिला आहे. याशिवाय मौजे रिटेवाडी ते मोरवड हे अंतर 6 किलोमीटर असून एक हजार मिलिमीटरच्या दोन पाईपलाईनमधून दोन हजार एचपीचे सहा विद्युत पंप बसवून रिटेवाडी उपसा सिंचन योजना सुरू करण्यास हरकत नाही, असाही अहवाल दिला आहे.
शिवाय केतुर ते सावडी हे अंतर 17 किलोमीटर असून केतुर येथील पाणी उचलून ते 1500 मिलिमीटर व्यासाच्या पाईपलाईनमधून एक हजार एचपी क्षमतेचे चार विद्युत पंप बसवून ही योजना सुरू करण्यास हरकत नाही. दोन्ही योजनेतून करमाळा तालुक्यातील जवळपास 50 गावातील 25,000 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येऊ शकते, असा अहवालही कुकडी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी दिला असून हा प्रकल्प अहवाल गुगलच्या माध्यमातून केला असून प्रत्येक ठिकाणचे पाणीसाठा व कॅनलची उंची याचे मोजमाप करण्यात आले आहे.
पण हा सर्व प्रश्न धोरणात्मक असल्यामुळे शासनाने निर्णय घ्यावा, असा अहवाल जलसंपदा विभाग पत्र क्रमांक 1866 दि. 26 एप्रिल 2023 प्रमाणे दिला आहे. त्यामुळे करमाळा तालुक्यातील कायमस्वरूपी दुष्काळी असलेल्या शेतकऱ्यांना पाणी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
याबाबत अधिकाऱ्यांनी सकारात्मक अहवाल दिल्यामुळे आता रिटेवाडी उपसासिंचन योजनासह केतुर उपसा सिंचन योजनेला सुद्धा गती मिळणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या प्रकल्पासंदर्भात तात्काळ मंत्रालयात बैठक घेऊन करमाळा तालुक्याला न्याय देतील, असा विश्वास मला वाटतो. – महेश चिवटे, जिल्हाप्रमुख, शिवसेना
ही योजना पूर्ण झाली तर मांगी तलावात कायमस्वरूपी पाणी राहील. जवळपास 20 ते 25 गावाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल. शिवाय मांगी प्रकल्पालगत असलेल्या करमाळा एमआयडीसीत पाणी उपलब्ध झाल्यामुळे मोठमोठे उद्योग घेऊन रोजगाराच्या संधी वाढतील. यामुळे या दोन्ही योजनांना मंत्रिमंडळाने तांत्रिक मंजुरी तात्काळ दिल्याने खऱ्या अर्थाने करमाळा तालुका सुजलाम सुफलाम होईल. – सुजिततात्या बागल, प्रगतशील शेतकरी, मांगी
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
I enjoyed the humor in this article! For more, click here: LEARN MORE. Let’s discuss!