सांगोला येथील विज्ञान महाविद्यालय येथे जिमखाना डे व पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न
सांगोला (बारामती झटका)
मंगळवार दि. ६ जून २०२३ रोजी विज्ञान महाविद्यालय, सांगोला येथे जिमखाना डे व पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सकाळी १० वाजता कार्यक्रमाची सुरुवात सांस्कृतिक कार्यक्रमाने झाली. सांस्कृतिक कार्यक्रमानंतर दिपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी महाविद्यालयाचे अहवाल वाचन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. कोळवले एच. डी. यांनी केले.
सदर कार्यक्रमावेळी प्रास्ताविकात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सिकंदर मुलाणी यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील गोरगरीब मुले शिकण्यासाठी महाविद्यालय व संस्था प्रयत्नशील आहे. तसेच नवीन शैक्षणिक धोरण व गुणवत्तावाढ याविषयी त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.
यावेळी कार्यक्रमाचे पाहुणे सांगोला तहसीलचे तहसीलदार श्री. संजय खडतरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले कि, माझा आणि महाविद्यालयाचा खूप दिवसाचा ऋणानुबंध आहे. त्यामुळॆ जिमखाना डे व पारितोषिक वितरण कार्यक्रमास मी आवर्जून उपस्थित आहे.
प्रमुख पाहुण्यांचा मनोगतानंतर महाविद्यालयातील गुणवंत प्राध्यापक प्रा. बी. डी. कोकरे, डॉ. किसन माने, डॉ. आदलिंगे एन. पी., डॉ. रुपनर पी. जे., डॉ. गडहिरे आर. टी, डॉ. राजेंद्र सूर्यवंशी यांचा करण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून प्रा. कोकरे बी. डी. लिखित चार पुस्तकांचा प्रकाशन सोहळा संपन्न करण्यात आला. प्राध्यापकांच्या सत्कार समारंभानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरणाचा व सत्कार समारंभाचा कार्यक्रम पार पडला. त्यामध्ये प्रा. विजय पवार यांनी जिमखाना अहवाल वाचन केले. तसेच खेळामध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय स्तरावरती विद्यापीठाकडून प्रतिनिधित्व करणाऱ्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचाही सत्कार समारंभ संपन्न झाला. तसेच बौद्धिक आणि सांस्कृतिक स्पर्धेमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न करण्यात आला. महाराष्ट्र राज्य प्राचार्य संघटनेचे माजी अध्यक्ष व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. जमादार के. एम. यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, कै. डॉ. गणपतराव देशमुख यांचे नाव महाराष्ट्रभर आदराने घेतले जाते. त्यांच्या महाविद्यालयामध्ये मला मनोगत व्यक्त करण्याचे भाग्य लाभले याचा मला मनस्वी आनंद होत आहे. माणसे जुळवत गेल्यास देश व समाज एकत्र येत जातो असे त्यांनी सांगितले.
त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे संचालक चंद्रकांतदादा देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यामध्ये त्यांनी असे सांगितले कि, ग्रामीण भाग आणि शहरी भाग मोबाईलमुळे एकत्र होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची सोय व्हावी व त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी महाविद्यालयाची स्थापना केली आहे. सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे सन्माननीय सचिव श्री. विठ्ठलरावजी शिंदे सर, संस्थेचे संचालक दिपकराव खटकाळे सर, संस्थेचे संचालक डॉ. अशोक शिंदे सर, समन्वयक डॉ. शंकरराव धसाडे व अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी आभार प्रदर्शन डॉ. रुपनर पी. जे. यांनी केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. किसन माने आणि प्रा. निसार शेख यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सिकंदर मुलाणी यांच्या मार्गदर्शनखाली महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, चतुर्थश्रेणी कर्मचारी व विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी अथक परिश्रम घेतले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng