माळशिरसचे माजी सरपंच स्वर्गीय बापूराव सिद यांच्या पुण्यतिथीनिमित्त नेत्ररोग तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन…

माजी सरपंच स्वर्गीय बापूराव तुळशीराम सिद यांच्या पुण्यतिथीनिमित्त काळा मारुती येळीव ते सिदाचीवाडी माळशिरस ज्योतीचे आयोजन…
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस शहराच्या जडणघडणीत व विकासामध्ये सिंहाचा वाटा असणारे माळशिरसचे माजी सरपंच स्वर्गीय बापूराव तुळशीराम सिद यांच्या 37 व्या पुण्यतिथी निमित्त शनिवार दि. 15/07/2023 रोजी सकाळी 07 ते 10 या वेळेमध्ये काळा मारुती येळीव ते सिदाची वाडी माळशिरस येथे ज्योत आणण्याचे नियोजन केलेले आहे.
माळशिरस शहराच्या विकासाची दूरदृष्टी असणारे स्व. बापूराव तुळशीराम सिद यांच्या 37 व्या पुण्यतिथीनिमित्त रविवार दि. 16/07/2023 रोजी सकाळी 8 ते दुपारी 12 या वेळेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिदाची वाडी माळशिरस येथे मोफत नेत्ररोग तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. नेत्ररोग तपासणी शिबिरात डोळे तपासणीसाठी डॉ. आप्पासाहेब टेळे व डॉ. राहुल बंडगर उपस्थित राहणार आहेत. तरी माळशिरस शहर व माळशिरस पंचक्रोशीतील गरजू व सर्व सामान्य नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन स्वर्गीय बापूराव सिद पुण्यतिथी कार्यक्रम समिती सिदाचीवाडी, माळशिरस यांच्यावतीने करण्यात येत आहे.

स्व. बापूराव तुळशीराम सिद यांचा सर्वसामान्य व शेतकरी कुटुंबामध्ये 14/06/1952 साली जन्म झालेला आहे. लहानपणापासून अंगामध्ये संघटन कौशल्य होते. समाजाविषयी आत्मीयता व प्रेम होते. त्यांना समाजामध्ये मानाचे स्थान होते. साधी राहणी व स्वच्छ विचारसरणी असलेले बापूराव यांना माळशिरस शहराच्या सरपंच पदावर काम करण्याची संधी माळशिरसकरांनी दिलेली होती. संधीचे सोने करत त्यांनी माळशिरस शहराचा सर्वांगीण विकास केलेला आहे. त्यांची राजकीय कारकीर्द व समाजकार्याची ओळख माळशिरसकरांना कायम आठवत असते. त्यांचा मृत्यू 15/07/1986 साली झालेला आहे.
आज त्यांच्या स्मृतीस 37 वर्षे झालेली आहेत. त्यांचा परिवार व मित्रपरिवार यांच्या वतीने समाज उपयोगी कार्यक्रम राबवून 37 वे पुण्यस्मरण संपन्न होत आहे. तरी सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन स्वर्गीय बापूराव सिद पुण्यतिथी कार्यक्रम समिती सिदाचीवाडी, माळशिरस यांच्यावतीने करण्यात येत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng