पंढरपूर तालुका माळी महासंघाच्या तालुका अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते शाम गोडसे यांची निवड

पंढरपूर (बारामती झटका)
पंढरपूर तालुका माळी महासंघाच्या तालुका अध्यक्षपदी फुल चिंचोली येथील सामाजिक कार्यकर्ते शाम बबन गोडसे यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. आगामी एक वर्षाकरीता ही निवड करण्यात आली आहे.
माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे, प्रदेश अध्यक्ष अरुण तिखे, माळी महासंघ महाराष्ट्र राज्य किसान आघाडीचे प्रदेश अध्यक्ष शंकरराव वाघमारे यांच्याशी चर्चा करून माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर जांभळे सर यांनी त्यांची निवड जाहीर केली आहे.
या निवडबद्दल पंढरपूर तालुक्यातील माळी समाजातून आनंद व्यक्त होत आहे. या निवडीबद्दल विश्वस्त भारत माळी, शंकरराव वाघमारे, रंगनाथ नाले, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश राऊत, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक अशोक जाधव, पंढरपूर मार्केट कमिटीचे संचालक नागनाथ मोहिते, ग्रामपंचायत सदस्य नारायण गायकवाड, हरिदास गायकवाड, दादा जाधव, पत्रकार सावता जाधव, नागेश जाधव, बबलू बनसोडे, अनिल बनसोडे, समाधान गायकवाड, दत्ता जाधव, आनंदा बनसोडे आदींनी त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.

या निवडीनंतर शाम गोडसे यांनी आगामी काळात समाजातील सर्वाँना सोबत घेवून माळी महासंघाच्या विचाराशी जोडणार असून माळी महासंघाचा विस्तार संपूर्ण पंढरपूर तालुक्यात व्हावा, असा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng