श्लोक दोशी मेजर ध्यानचंद्र केंद्रीय क्रीडा अकॅडमीचे सुवर्ण लक्ष नॅशनल स्पोर्ट अवार्ड पुरस्काराने सन्मानित
नातेपुते (बारामती झटका)
रत्नागिरी येथे झालेल्या मेजर ध्यानचंद्र केंद्रीय क्रीडा अकॅडमीच्या परिषदेमध्ये श्लोक स्नेहा अभिनंदन दोशी यास सुवर्ण लक्ष नॅशनल स्पोर्ट अवार्ड प्रदान करण्यात आले. दि. २९ ऑगस्ट हा मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून भारतात साजरा करण्यात आला आणि त्याच राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या अवचित साधून रत्नागिरी येथे दि. २९ ऑगस्ट २०२३ रोजी मेजर ध्यानचंद केंद्रीय क्रीडा परिषद भारत आयोजित राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२३ आयोजन केले.
संपूर्ण भारतातील ३२ प्रकारच्या विविध खेळातून उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडू व प्रशिक्षक यांना राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो. चिरंजीव श्लोक स्नेहा अभिनंदन दोशी यांनी स्केटिंग खेळातून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्याला व्हीआयपी पर्सनमधून मेजर ध्यानचंद केंद्रीय क्रीडा पुरस्कार भारत आणि मास्टर चंदगीराम क्रीडा पुरस्कार हे दोन पुरस्कार देऊन त्याचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे एम. देवेंद्रसिंह जिल्हाधिकारी रत्नागिरी, तसेच धनंजय कुलकर्णी जिल्हा पोलीस अधीक्षक रत्नागिरी, व सभापती डि. आर. जाधव आणि सभागृह नेते सुनील पवार यांच्याहस्ते श्लोकला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. श्लोकने आजपर्यंत आंतरराष्ट्रीय चार सुवर्णपदक राष्ट्रीय दोन अशी पदके मिळवली आहेत. तसेच त्याचे गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड व १५ बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याची नोंद झाली आहे. तसेच २१ सुवर्णपदक, ६ सिल्वर पदक ११ ब्रांझ पदक त्यांनी घेतले आहेत. त्याच्या या जिद्द, धडाडी व यशामागे आई सौ. स्नेहा, वडील अभिनंदन दोशी, आजोबा स्वर्गवासी सुकुमार दोशी व आजी सुरेखा दोशी, खटावकर परिवार यांचे प्रोत्साहन मिळाले आहे. त्याच्या या यशाला त्याचे प्रशिक्षक विजय मलजी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतल्यामुळे त्याला हे सुयश प्राप्त झाले आहे. व अजूनही तो त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत असून त्यात विजय सर यांचाही मोलाचा वाटा आहे. श्लोकने स्केटिंग या खेळात आपले नाव सर्वत्र कौतुक अभिनंदन होत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng