क्रीडाताज्या बातम्या

भांब येथे गणेशोत्सवानिमित्त भव्य राज्यस्तरीय एक दिवसीय कबड्डी सामन्यांचे आयोजन

भांब (बारामती झटका)

भांब पाटीलवस्ती, ता. माळशिरस येथे गणेशोत्सवानिमित्त जय भवानी गणेश तरुण मंडळ भांब, पाटीलवस्ती व नवरात्र उत्सव तरुण मंडळ, पाटीलवस्ती यांच्यावतीने भव्य राज्यस्तरीय एक दिवसीय कबड्डी सामन्यांचे आयोजन शनिवार दि. २३/०९/२०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पाटीलवस्ती येथे करण्यात आले आहे.

या स्पर्धेमध्ये ५५ किलो वजनी गटात सामने होणार आहेत. यामध्ये प्रथम क्रमांकाचे ११,१११ रुपयांचे बक्षीस व चषक धनाजी शंकर काळे (श्री एंटरप्राइजेस, पुणे) यांच्याकडून देण्यात येणार आहे. तर द्वितीय क्रमांकाचे ७,७७७ रुपये व चषक ब्रह्मदेव (बी.एम) पाटील (कॉन्ट्रॅक्टर, पुणे) यांच्याकडून देण्यात येणार आहे. तृतीय क्रमांकाचे बक्षीस ५,५५५ रुपये व चषक नितीन विठ्ठल काळे (इंडियन आर्मी) व बलभीम पांडुरंग काळे वायरमन यांच्याकडून देण्यात येणार आहे. चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस ३,३३३ रुपये व चषक समीर मोहन काळे व ब्रह्मदेव सुखदेव काळे यांच्याकडून देणार देण्यात येणार आहे.

तसेच उत्कृष्ट पकडसाठी १००१ रुपयांचे बक्षीस सुभाष नाना काळे, उत्कृष्ट रेडरसाठी १००१ रुपयांचे बक्षीस महादेव मारुती काळे, अष्टपैलू खेळाडूसाठी १००१ रुपयांचे बक्षीस तानाजी नारायण काळे तर मॅन ऑफ द सिरीजसाठी १००१ रुपयांचे बक्षीस दिलीप किसन काळे व राजाराम यशवंत काळे यांच्यावतीने देण्यात येणार आहे.

या स्पर्धेसाठी भुजबळ मंडप गिरवी यांचे विशेष सहकार्य असणार आहे. तसेच अधिक माहितीसाठी ९७६४६१३३२७, ८५९१०९८७२७, ९९२२०४५०६३, ९३२५७५५५७२, ९३२२००४६९४ या नंबर वर संपर्क साधावा.

तरी या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button