ताज्या बातम्याराजकारण

पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर आले आणि दुष्काळी जनतेची मने जिंकून गेले.

माळशिरस तालुका टंचाई आढावा बैठकीत अधिकारी व जनता यांच्यात सलोखा ठेवून दुष्काळी जनतेला हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले होते.

माळशिरस (बारामती झटका)

माढा लोकसभेचे कार्यतत्पर पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत माळशिरस तालुक्यातील टंचाई आढावा बैठक शनिवार दि. 16 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी चार वाजता पंचायत समिती, माळशिरस येथील सभागृहात प्रांताधिकारी नामदेव टिळेकर, तहसीलदार सुरेश शेजुळ, नायब तहसीलदार अमोल कदम, गटविकास अधिकारी विनायक गुळवे, तालुका कृषी अधिकारी सौ. पूनम चव्हाण, नातेपुते, माळशिरस, अकलूज, महाळुंग श्रीपुर या नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांच्यासह पाणीपुरवठाविभाग, नीरा उजवा कालवा जलसंपदा विभाग, जलसंधारण विभाग प्रमुख व माळशिरस तालुक्यातील लोकप्रतिनिधी, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सोपानकाका नारनवर, सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य भाजपचे सोलापूर जिल्हा सहकारी व प्रांतिक सदस्य के. के. पाटील, माळशिरस नगरपंचायतीचे नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख, माजी उपनगराध्यक्ष डॉक्टर मारुतीराव पाटील, फलटण-लोणंद रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष खंडकरी नेते ॲड. सोमनाथ वाघमोडे, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, माळशिरस पंचायत समितीचे गटनेते रणजीतसिंह जाधव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माळशिरस तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने पाटील, राष्ट्रवादीचे नेते रमेशभाऊ पाटील, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष पांडुरंग वाघमोडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष आंदोलन वीर अजितभैया बोरकर, निरा-देवधर उर्वरित संघर्ष समितीचे अध्यक्ष जलनायक शिवराज पुकळे, भाजपचे माळशिरस तालुका संघटन सरचिटणीस संजयजी देशमुख, पंचायत समिती सदस्य अजय सकट, बाळासाहेब वावरे, पांडुरंग देशमुख, अतुलजी सरतापे, विष्णुपंत नारनवर, युवराज झंजे, भुजंगराव शिंगाडे, पांडुरंग पिसे, विजयराव गोरड, किसन राऊत, युवा सरपंच विष्णूभाऊ गोरड, मच्छिंद्र गोरड सर यांच्यासह विविध गावचे आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, विविध राजकीय पक्षांचे व संघटनांचे नेते व कार्यकर्ते यांची संयुक्त टंचाई आढावा बैठक संपन्न झाली.

सदरच्या बैठकीत अधिकारी व जनता यांच्यात सलोखा ठेवून दुष्काळी जनतेला हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले होते. अनेक गावच्या लोकप्रतिनिधी व सर्व सामान्य जनतेने आपल्या टंचाईबाबत व इतर अडचणी सांगितलेल्या होत्या. त्यावर अधिकारी त्यांच्याकडून सकारात्मक उत्तर घेतले जात होते. पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर टंचाई आढावा बैठकीसाठी आले आणि दुष्काळी जनतेची मने जिंकून गेले.

माळशिरस तालुक्यात पावसाने दिलेली ओढ व त्यामुळे निर्माण झालेली पाण्याची प्रचंड टंचाई, भविष्यात जनावरांचा चारा, शेती व पिण्याच्या पाण्याचा सतावणारा प्रश्न या नियोजनासाठी माढा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी 16 सप्टेंबर 2023 रोजी माळशिरस तालुक्यात टंचाई आढावा बैठकीचे आयोजन केलेले आहे. यावेळी माळशिरस तालुक्यात प्रशासन व जनता यांच्यावतीने कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांचा प्रांताधिकारी श्री. नामदेव टिळेकर यांनी सन्मान केला.

यंदा पावसाने चांगलीच ओढ दिल्याने संपूर्ण माढा मतदारसंघात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याची सद्य परिस्थिती असून भविष्यात येणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज असण्याची गरज आहे. यासाठी टंचाई आढावा बैठकीचे आयोजन केलेले होते. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी टंचाई, गावातील लोकांच्या अडचणी ऐकून घेतली. पाण्याच्या समस्येबरोबर इतरही काही समस्येवर सकारात्मक चर्चा झाली. खासदार व प्रशासनातील अधिकारी यांनी टंचाई समस्येवर सकारात्मक उत्तरे देऊन जनतेचे समाधान केलेले आहे. जनतेलाही हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झालेले असल्याने मनमोकळेपणाने प्रशासनातील अधिकारी व पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्याशी सुसंवाद साधून जनतेने आपली मने हक्काच्या माणसांपाशी व्यक्त केलेली होती. दोन तास चाललेल्या टंचाई बैठकीमध्ये जनतेचे समाधान करण्यामध्ये पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व प्रशासनातील अधिकारी यशस्वी ठरलेले असल्याने खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर आले आणि दुष्काळी जनतेची मने जिंकून गेले, अशी भावना उपस्थित जनतेची झालेली होती.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button