भारतीय जनता पक्षाच्या माळशिरस तालुका अध्यक्षपदी तालुक्याच्या पश्चिम भागातील मोहिते पाटील समर्थकाची वर्णी….

नातेपुते (बारामती झटका)
भारतीय जनता पक्षाचे माळशिरस तालुका अध्यक्ष बाजीराव काटकर यांच्याकडे जिल्ह्यातील पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. भारतीय जनता पक्षाच्या माळशिरस नूतन तालुका अध्यक्षपदी माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील मोहिते पाटील समर्थक यांची वर्णी लागणार असल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आलेले आहे.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्रातील प्रदेश जिल्हा व तालुका कार्यकारणीमध्ये बदल केलेले आहेत. सोलापूर जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब उर्फ चेतनसिंह केदार सावंत यांची नियुक्ती केलेली आहे. नूतन जिल्हाध्यक्ष केदार सावंत यांनी माळशिरस तालुका अध्यक्ष बाजीराव काटकर यांना जिल्ह्याच्या कार्यकारणीत घेतलेले आहे.
माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील धनगर समाजाचे मोहिते पाटील समर्थक यांची वर्णी लागणार असल्याचे भाजपच्या गोटातून बोलले जात आहे. भारतीय जनता पक्षाचे माळशिरस तालुका अध्यक्ष यांचे नाव काय आहे, याबद्दल बारामती झटका वेब पोर्टल चमूकडे खात्रीलयक वृत्त आहे. लवकरच माळशिरस तालुका अध्यक्ष यांच्या नावाची घोषणा होणार आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng