डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर जिल्हा तालीम संघाची बैठक संपन्न झाली.
65 वी राज्यस्तरीय अजिंक्यपद अधिवेशन महाराष्ट्र केसरी किताबासाठी जिल्हा निवड चाचणी नियोजन करण्यात आले.
धवलनगर (बारामती झटका)
सोलापूर जिल्हा महाराष्ट्र केसरी निवड चाचणी स्पर्धा 2023 सोलापूर जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष डॉ. धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर जिल्हा तालीम संघाची मीटिंग प्रतापगड, धवलनगर येथे आयोजित करण्यात आली होती. सदर मीटिंगमध्ये 65 वी राज्यस्तरीय अजिंक्यपद अधिवेशन महाराष्ट्र केसरी (धाराशिव) किताब लढतीसाठी निवड चाचणी घेण्याविषयी चर्चा करण्यात आली.
महाराष्ट्र केसरी निवड चाचणी कुस्ती स्पर्धा ही पंढरपूर तालुका कुस्ती असोसिएशनला देण्यात यावी असा विषय, महाराष्ट्र केसरी छोटा रावसाहेब मगर यांनी मांडला. त्याला उपाध्यक्ष सर्जेराव चौरे यांनी अनुमोदन दिले. व हा विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
सदर मीटिंगसाठी सोलापूर जिल्हा तालीम संघाचे पदाधिकारी सचिव पै. भरत मेकाले, कार्याध्यक्ष वामनभाऊ उबाळे, उपाध्यक्ष छोटे रावसाहेब मगर, खजिनदार महादेव ठवरे, पै. महादेव भंडारी, पै. मारुती वाकडे, पै. महेश कुलकर्णी, पै. मुन्ना डमरे, पै. सचिन भोपळे, पै. शेरीकर, पै. ज्ञानदेव पालवे, पै. नारायण माने, पै. दादा धोत्रे, पै. सोमनाथ सुर्वे, पै. बालाजी चव्हाण, पै. महादेव कुसुमडे, पै. अमित पाटोळे, पै. समाधान अभंगराव, पै. रजनीकांत चौरे, पै. दगडे उपस्थित होते. स्पर्धा दि. 17 ऑक्टोंबर व 18 ऑक्टोंबर 2023 पंढरपूर, वजने सकाळी 9 ते 11 या वेळेत होतील, वजनाच्या वेळी सर्व खेळाडूंनी ओरिजनल आधार कार्ड, घेऊन येणे हे सर्व खेळाडूंना बंधनकारक आहे, अन्यथा वजन घेतले जाणार नाही. स्पर्धेचे ठिकाण – पंढरपूर, आयोजक -पंढरपूर तालुका कुस्ती असोसिएशन, महाराष्ट्र केसरी, वजन गट – 57 किलो, 61 किलो, 65 किलो, 70 किलो, 74 किलो, 79 किलो, 86 किलो, 92 किलो, 97 किलो व ओपन गट महाराष्ट्र केसरी
कुमार वजन गट -45 किलो, 48 किलो, 51 किलो, 55 किलो, 60 किलो, 65 किलो, 71 किलो, 80 किलो, 92 किलो, 110 किलो. जन्मतारीख 2006 व 2008 असावी व 2008 ला मेडिकल सर्टिफिकेट/ पालकाची संमती पत्र देणे.
कुमार कुस्तीगीरांनी सोबत येताना पासपोर्ट/आधार कार्ड/बोनाफाईड/दहावी बारावी बोर्ड सर्टिफिकेट यापैकी एक असे सोबत आणावे व प्रत्येकाची झेरॉक्स एक आणावी. वजनामध्ये 2 किलो वजनाची सूट दिली जाईल.
संपर्क – ज्ञानदेव पालवे (कामगार केसरी) 9975769950, पै. नारायण माने (एनआयएसकुस्तीकोच) 9890465662.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
This was such an interesting read! I chuckled a few times. For more laughs and insights, visit: DISCOVER HERE. Anyone else have thoughts on this?