कुसमोड गावच्या विद्यमान उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह अनेक मान्यवरांचा भाजपमध्ये प्रवेश..
लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या विकासकामाची दमदार कामगिरी व नूतन जिल्हाध्यक्ष ज्योतीताई पाटील यांच्या राजकीय कौशल्यामुळे भाजपमध्ये इन्कमिंगला सुरुवात…
पिलीव (बारामती झटका)
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार आरोग्यदूत राम सातपुते यांच्या दमदार विकास कामांमुळे व सोलापूर जिल्हा परिषदेच्या स्टॅंडिंग कमिटी सदस्या व भारतीय जनता पक्षाच्या सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षा सौ. ज्योतीताई केके पाटील यांच्या राजकीय कौशल्यामुळे आणि सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य भाजपचे प्रांतिक सदस्य व सोलापूर जिल्हा सह प्रभारी के. के. पाटील यांच्या संपर्कामुळे माळशिरस तालुक्यातील कुसमोड गावच्या विद्यमान उपसरपंच स्वाती मदने, ग्रामपंचायत सदस्या व माजी उपसरपंच राणी पवार, ग्रामपंचायत सदस्य शहाजी लेंगरे, माजी सरपंच शशीकला लोखंडे, माजी उपसरपंच संजय पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र पवार, पिलीव विकास सेवा सोसायटीचे माजी व्हा. चेअरमन सुग्रीव लेंगरे सर, संचालक नबाजी मदने यांच्यासह गोपाळ माळी, रामचंद्र पवार, सागर गोंजारी, शशिकांत घडयाळे, मोतीराम पवार, अण्णासो ठेंगल, लक्ष्मण पवार, शहाजी वाघ, व्यंकु पवार, अनिल वाघमोडे, राहुल लवटे,अक्षय गोंजारी, दिलीप पांढरे, अशोक लेंगरे, अंकुश लेंगरे, सुभाष मदने, कुमार राऊत, विनायक मदने, सुखदेव मदने, नाथा मदने, सचिन खटके, वैभव राऊत, राहुल मदने, सुभाष काळे, रामचंद्र गोंजारी, दत्तु गारुळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी भारतीय जनता पार्टीमध्ये भाजपच्या नुतन महीला जिल्हा अध्यक्षा सौ. ज्योतीताई पाटील, भाजपचे महाराष्ट्र कार्यकारीणी सदस्य तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य के. के. पाटील, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब सरगर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब वावरे, माळशिरस तालुका संघटन सरचिटणीस संजयजी देशमुख, भाजपचे जिल्हा कार्यकारणी सदस्य राहुल मदने, तालूका उपाध्यक्ष बलभीम जाधव, तालुका उपाध्यक्ष तुषार लवटे, युवा मोर्चाचे माजी उपाध्यक्ष युवराज वाघमोडे यांच्या प्रमुख उपस्थित प्रवेश करण्यात आला.
यावेळी कुसमोडचे माजी उपसरपंच संजय पाटील यांनी आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार रामभाऊ सातपुते यांच्या माध्यमातून गावातील व प्रभागातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी आपण सहकाऱ्यांसह भाजपमध्ये प्रवेश करीत असल्याचे सांगितले.
यावेळी सुग्रीव लेंगरे यांनी भाजपच्या माध्यमातून विकास कामे मार्गी लावावीत अशी अपेक्षा व्यक्त केली. तर राहुल मदने, बाळासाहेब वावरे, विठ्ठल मदने यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.
तसेच या निर्णयामुळे कुसमोड गावच्या विकासाला नक्कीच चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली. तर यावेळी भाजपचे नेते के. के. पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सर्वांचे भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत असुन आपण कुसमोड गावच्या विकासासाठी कटीबद्ध आहोत. यापुर्वी जिल्हा परिषद सदस्य या नात्याने कुसमोड गावाला भरपूर निधी दिला आहे. तर यापुढेही आपण रस्ते, विज, पाणी यासह इतर कामांना निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.
सदर कार्यक्रमाला विजय मदने, सदाशिव मदने यांसह कुसमोड तसेच आसपासच्या परीसरातील अनेक मान्यवर उपस्थितीत होते. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजय पाटील यांनी केले तर आभार तुषार लवटे यांनी मानले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
I enjoyed the humor in this piece! For more, visit: FIND OUT MORE. Let’s chat about it!