भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाच्या माळशिरस विधानसभा संयोजकपदी शाहिद शेख यांची निवड
चांदापुरी (बारामती झटका)
आभाळाची आम्ही लेकुरे, काळी माती आई,
धर्म आमुचा नाही वेगळा, जात वेगळी नाही…
धर्मनिरपेक्षतेने ओतंबलेली भावना मनात घेवुन मी माझ्या आयुष्याची, सामाजिक सेवेची वाटचाल करत आहे. याचे गोड फळ म्हणजे माझी माळशिरस तालुका भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाच्या माळशिरस विधानसभा प्रभारीपदी निवड झाली आहे. मी या पदाचा बहुजन, अल्पसंख्याक व सर्वसमावेशक समाजाच्या सेवेसाठी ऋणी राहीन, असा विश्वास माळशिरस विधानसभेचे भाजपचे प्रभारी (संयोजक) शाहिद गुलाब शेख यांनी व्यक्त केला. ते आपल्या निवडीबद्दल सामाजिक कार्यकर्त्यासमोर आपले विचार व्यक्त करताना बोलत होते.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशाने व आ. राम सातपुते, आ. रणजितसिंह मोहिते पाटील, भाजप संघटन सरचिटणीस धैर्यशील (भैय्यासाहेब) मोहिते पाटील, मुख्तारभाई कोरबु भाजप अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष सोलापुर यांच्या सुचनेनुसार भाजप अल्पसंख्याक मोर्चा माळशिरस विधानसभा संयोजक (प्रभारीपदी) शाहिद गुलाब शेख यांची निवड करण्यात आली.
या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली मी माळशिरस तालुका भाजपमय करण्यासाठी वचनबद्ध आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ग्रुपमध्ये
बारामती झटका न्यूज संपादक श्रीनिवास कदम पाटील
98 50 10 49 14 हा नंबर समाविष्ट करावा..