ताज्या बातम्या

आ. रणजीतसिंह मोहिते पाटील व आ. राम सातपुते यांच्या शुभहस्ते तरंगफळ गावच्या विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन समारंभाचे आयोजन..

तरंगफळ (बारामती झटका)

विधान परिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील व माळशिरस विधानसभेचे आमदार राम सातपुते यांच्या शुभहस्ते तरंगफळ ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांचा उद्घाटन व भूमिपूजन कार्यक्रम रविवार दि. 15/10/2023 रोजी दुपारी 04 वाजता सिद्धनाथ मंदिर तरंगफळ, ता. माळशिरस येथे शिवामृत दूध संघाचे चेअरमन भाजपचे संघटन महामंत्री धैर्यशील मोहिते पाटील, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, माळशिरस पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विनायकजी गुळवे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

तरंगफळ ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजनामध्ये माळशिरस ते पिलीव डांबरीकरण रोड, मायाक्का मंदिर जानकर वस्ती खंडोबा मंदिर, माणिकराव पाटील वस्ती या तीन ठिकाणी हायमास्ट दिव्यांचे, गोरडवाडी ते तरंगफळ डांबरीकरण रोड पिलीव रोड ते डॉक्टर नानासाहेब तरंगे वस्ती रोड, मेन रोड ते जानकर वस्ती रोड, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघमोडे वस्ती वॉल कंपाऊंड, आगतराव तरंगे वस्ती अंगणवाडी शेड, सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन, पिण्याच्या पाणी आरो युनिट, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक सूशोभिकरण, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारक सूशोभिकरण, अशा कामांचा उद्घाटन व भूमिपूजन कार्यक्रम संपन्न होणार आहे.

सदरच्या कार्यक्रमास लोकनियुक्त थेट जनतेतील सरपंच सौ. पद्मिनी नारायण तरंगे, उपसरपंच श्री. पांडुरंग मारुती कांबळे, ग्रामविकास अधिकारी संतोष पानसरे भाऊसाहेब, सर्व सदस्य यांच्यावतीने सर्व ग्रामस्थ बंधू भगिनींना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ग्रुपमध्ये
बारामती झटका न्यूज संपादक श्रीनिवास कदम पाटील
98 50 10 49 14 हा नंबर समाविष्ट करावा..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button