ताज्या बातम्या

कदमवाडी ग्रामपंचायतीमध्ये ‘कुंपणच शेत खातंय’, असा प्रकार चालू

कदमवाडी (बारामती झटका)

कदमवाडी (ता. माळशिरस) ग्रामपंचायत येथे शौचालयाचे अनुदान ग्रामपंचायत सदस्यांनीच लाटलेले आहे, शासनाने ज्यांना शौचालय नाही, अशा गोरगरीब जनतेला शौचालय बांधता यावे म्हणून बारा हजार रुपयांचे अनुदान दिलेले आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीचा अर्ज भरताना सदर ग्रामपंचायतीच्या सदस्यांना शौचालय असल्याचा दाखला घेणे बंधनकारक असते. याचा अर्थ सदर ग्रामपंचायत सदस्याकडे पूर्वीचेच शौचालय आहे. कोणत्याही ग्रामपंचायत सदस्याला व पदाधिकाऱ्यांना ग्रामपंचायतीचा कोणताही लाभ घेता येत नाही, असे असतानासुद्धा सरपंच, ग्रामसेवक व तत्सम अनुदान लाटणारे ग्रामपंचायत सदस्य यांनी संगणमताने ग्रामपंचायत व शासनाची फसवणूक केलेली आहे. सदर सदस्य, सरपंच व ग्रामसेवक यांच्यावरती माळशिरस पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी श्री. गुळवे साहेब काय कारवाई करणार, याच्याकडे तालुक्याचे लक्ष लागलेले आहे.

एवढ्या वरतीच न थांबता सदर ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामसेवक यांनी संगणमताने ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार केलेले आहेत. कदमवाडी अंतर्गत येणाऱ्या जुनिवडी या ठिकाणची बोरवेलमधील मोटार जळाली म्हणून बील काढले गेलेले आहे. ज्या व्यक्तीच्या नावे बिल काढले गेलेले आहे, त्या व्यक्तीच्या परस्पर सदर व्यक्तीस बिलाबाबत कसलीही माहिती नसताना व सदर व्यक्तीस बँकेत न नेता बनावट सही करून बँकेच्या खात्यावरून पैसे काढलेले आहेत. सदर बँकेच्या सीसीटीव्ही तपासून शासनाची फसवणूक करणाऱ्या सदर भामट्यांवरती कडक कार्यवाही होईल का ?, सदर गावची अवस्था ‘कदमवाडी गाव तसं लई चांगलं पण, ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनीच भ्रष्टाचार करून वेशीला नेऊन टाकलं असं झालंय’, स्वतःला गावचं मोठं पुढारी समजणाऱ्यांनीच स्वतःच्या उपजीविकेसाठी छाटछुट असे खूप भ्रष्टाचार केले आहेत. अशा संगणमत करून भ्रष्टाचार करणाऱ्या टोळीवरती माळशिरस पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी मा. विनायकजी गुळवे साहेब काय कार्यवाही करणार ?, याकडे संपूर्ण माळशिरस तालुक्याचे लक्ष लागून राहिलेले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ग्रुपमध्ये बारामती झटका न्यूज संपादक श्रीनिवास कदम पाटील 9850104914 हा नंबर समाविष्ट करावा..

Related Articles

Leave a Reply

Back to top button