झी टॉकीज फेम ह. भ. प. सागर महाराज बोराटे यांचे सुश्राव्य कीर्तन कण्हेर येथे संपन्न होणार.
माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य गौतमआबा माने पाटील यांचे पिताश्री स्व. नामदेवराव माने पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त किर्तन, आरती, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन.
कण्हेर (बारामती झटका)
कण्हेर ता. माळशिरस गावचे प्रगतशील बागायतदार स्व. नामदेव श्रीपती माने पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त झी टॉकीज फेम ह. भ. प. सागर महाराज बोराटे, नातेपुते यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन बुधवार दि. २५/१०/२०२३ रोजी सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत कण्हेर गावच्या नजीक रानमळा, ता. माळशिरस येथे आयोजन करण्यात आले आहे.
प्रथम पुण्यस्मरण तथा वर्षश्राद्ध निमित्त कीर्तन, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी नातेवाईक व मित्रमंडळी, समस्त ग्रामस्थ यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्रीपती नामदेव माने पाटील, गौतम (आबा) नामदेव माने पाटील, हौसराव नामदेव माने पाटील, एकनाथ नामदेव माने पाटील, दिलीप नामदेव माने पाटील, बाबासाहेब नामदेव माने पाटील, श्रीमंत नामदेव माने पाटील, उत्तम आबाजी माने पाटील यांच्यावतीने करण्यात आले आहे.
आपणास हस्ते परहस्ते निमंत्रण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. घाईगडबडीत नजरचुकीने कोणी राहून गेल्यास हेच निमंत्रण समजून आमच्या वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य गौतमआबा माने पाटील व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माळशिरस तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने पाटील व समस्त माने पाटील, कण्हेर यांच्यावतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ग्रुपमध्ये बारामती झटका न्यूज संपादक श्रीनिवास कदम पाटील 9850104914 हा नंबर समाविष्ट करावा..
I found this article both informative and thought-provoking. The analysis was spot-on, and it left me wanting to learn more. Let’s discuss further. Check out my profile for more related discussions!