माळशिरसचे तहसीलदार सुरेश शेजुळ यांनी मराठा आमरण उपोषणस्थळी सदिच्छा भेट दिली.
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ माळशिरस येथे मराठा समाजातील युवकांसह ज्येष्ठ नागरिकांनी मुंडन करून शासनाचा निषेध नोंदविला.
माळशिरस (बारामती झटका)
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी या ठिकाणी मराठा समाजास हक्काचे आरक्षण मिळावे यासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. महाराष्ट्रात अनेक गावांमध्ये मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ साखळी उपोषण, अन्नत्याग आंदोलन असे विविध आंदोलने सुरू आहेत. माळशिरस येथे माळशिरस पंचक्रोशीतील आसपासच्या गावातील सकल मराठा समाज बांधवांच्यावतीने चक्री उपोषण सुरू होते. त्यामध्ये नंदकुमार घाडगे व संतोष साळुंके यांनी आमरण उपोषण सुरू केलेले आहे.
शासनाने उपोषणाची दखल घ्यावी, मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत असल्याने मराठा समाज वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करीत आहेत. आमरण उपोषण सुरू असलेल्या ठिकाणी मराठा समाजातील जालिंदर सिताराम पवार मेडद, तानाजीराव रणवरे सर मांडकी, खंडूतात्या कळसुले पवार गोरडवाडी, आनंदराव सालगुडे पाटील पुरंदावडे, संग्रामसिंह कापसे सदाशिवनगर, विश्वजीत सालगुडे पाटील पुरंदावडे, रामदास रोकडे येळीव, विपुल रणवरे पाटील सदाशिवनगर, सचिन चव्हाण माळशिरस, यांनी मुंडन करून सरकारचा जाहीर निषेध केला आहे.
माळशिरसचे तहसीलदार सुरेश शेजुळ व निवासी नायब तहसीलदार अमोल कदम यांनी आमरण उपोषणस्थळी भेट देऊन उपोषण कर्ते यांच्या तब्येतीची विचारपूस करून आंदोलन शांततेत करून सहकार्य करण्याचे आवाहन केले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.