भांबुर्डी गावचे प्रगतशील बागायतदार अण्णा (नाना) संभाजी वाघमोडे यांचे दुःखद निधन…

भांबुर्डी गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य विष्णू वाघमोडे यांना पितृषोक..
भांबुर्डी (बारामती झटका)
भांबुर्डी, ता. माळशिरस, येथील प्रगतशील बागायतदार अण्णा (नाना) संभाजी वाघमोडे यांचे वयाच्या 70 व्या वर्षी अल्पशा आजाराने मंगळवार दि. 15/07/2025 रोजी दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, दोन मुली, सुना, नातवंडे, भाऊ, बहीण असा परिवार आहे. भांबुर्डी गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य विष्णू वाघमोडे यांचे ते वडील होते. त्यांच्यावर भांबुर्डी येथील शेतातील निवासस्थानाशेजारील शेतामध्ये शोकाकुल वातावरणात सायंकाळी 05 वाजता अंतिम संस्कार करण्यात आलेले आहेत.
गुरुवार दि. 17/07/2025 रोजी सकाळी 07 वाजता रक्षाविसर्जन तिसऱ्याचा कार्यक्रम होणार आहे.
स्वर्गीय अण्णा (नाना) वाघमोडे यांच्या आत्म्यास शांती लाभो व वाघमोडे परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो, हीच बारामती झटका परिवार यांच्याकडून भावपूर्ण आदरांजली आहे..
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



