ताज्या बातम्यासामाजिक

नातेपुते येथे मराठा आरक्षण आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया माळशिरस तालुक्याच्यावतीने जाहीर पाठिंबा

नातेपुते (बारामती झटका)

नातेपुते येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) माळशिरस तालुक्याच्या वतीने महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू असलेल्या मराठा आरक्षणाला जाहीर पाठिंबा दिला आहे. तसे निवेदनही राष्ट्रीय कुस्ती पटू कु. समीक्षा सोमनाथ जाधव यांच्याकडे देण्यात आले आहे. यावेळी आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी भगवे उपरणे घालून जाहीर पाठींबा दिला आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण चालू आहे. त्यांना साथ देत राज्यांमध्ये सर्वत्र साखळी उपोषण चालू आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले आणि माळशिरस तालुका सरचिटणीस रोहित उर्फ बादल सोरटे यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. तसे निवेदन देखील देण्यात आले आहे.

या निवेदनात असे म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा समाज हा नेहमी क्रांती व समाज परिवर्तनामध्ये अग्रेसर असून छत्रपती शिवरायांनी तमाम रयतेला आपले मानून समतेची बिजे रोवली. सद्यस्थितीला मराठा समाज हा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक तसेच इतर बाबींमध्ये देखील मागासलेला असून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, हीच आमची तसेच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासाची आठवले यांची देखील भूमिका आहे. रामदासजी आठवले साहेबांनी संसदेमध्ये देखील मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली आहे.

यावेळी जयंती समिती अध्यक्ष नवाज सोरटे, तालुका सरचिटणीस रोहित उर्फ बादल सोरटे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष युवराज वाघमारे, आरपीआयचे ज्येष्ठ नेते दिगंबर सोरटे, शहर अध्यक्ष संघर्ष सोरटे, सौरभ साळवे, विनीत सोरटे, मानव सोरटे, शुभम भोसले, महादेव साळवे, अक्षय सावंत, वैभव सोरटे, गणेश सोरटे, राज साळवे आदी उपस्थित होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button