ताज्या बातम्या

मोरोची ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी पै. किशोर लक्ष्मणराव सुळ यांची बिनविरोध निवड.

मोरोची ग्रामपंचायतला पै. किशोर लक्ष्मणराव सुळ यांच्या रूपाने उच्च विद्या विभूषित व राष्ट्रीय गोल्ड मेडल असणारे वजनदार उपसरपंच लाभलेले आहेत.

मोरोची (बारामती झटका )

माळशिरस तालुक्यातील प्रतिष्ठित असणाऱ्या मोरोची ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी एम. ए. बी. एड. कुस्ती व वेटलिफ्टिंगमध्ये 105 वजन किलो गटात राष्ट्रीय गोल्ड पदक मिळवणारे आंतरराष्ट्रीय खेळाडू व उच्च विद्या विभूषित पैलवान किशोर लक्ष्मणराव सुळ यांची उपसरपंच पदी सर्वानुमते बिनविरोध निवड झालेली आहे.

मोरोची ग्रामपंचायतीची निवडणूक लक्ष्मण आप्पासो सुळ व मोरोचीचे माजी सरपंच जालिंदर देवबा सुळ या दोन पार्टी प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली झालेली होती. सत्ता परिवर्तन होऊन सर्वच्या सर्व 13 जागा निवडून आलेल्या होत्या. सर्वांना सत्तेत सामावून घेण्याकरता सरपंच व उपसरपंच यांची ठराविक कालावधीसाठी नेमणूक करण्यात येत होती. पार्टीचे ठरल्याप्रमाणे सरपंच व उपसरपंच यांच्या निवडी करण्यात येत आहेत. उपसरपंच सौ. अरुणा लक्ष्मण सुळ यांनी दि. 04/10/2023 रोजी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंच पदाची निवड दि. 01/10/2023 रोजी सरपंच तथा अध्याशी अधिकारी सौ. छाया भागवत झेंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी माळशिरस पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री. ए. एम. सरवदे निवडणूक निरीक्षक म्हणून उपस्थित होते. ग्रामविकास अधिकारी श्री. ए. जी. लोंढे यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयात ठीक दोन वाजता उपसरपंच पदाच्या निवडी करता विशेष सभेचे आयोजन करण्यात आलेले होते.

त्यावेळी सरपंच सौ. छाया भागवत झेंडे, मावळत्या उपसरपंच सौ. अरुणा लक्ष्मण सूळ, ग्रामपंचायत सदस्य श्री. समाधान शिवाजी गोरे, सौ. अश्विनी राजन सूळ, श्री. हनुमंत दत्तू फुले, श्री. बाळू हरिभाऊ माने, श्री. किशोर लक्ष्मणराव सूळ, सौ. नंदिनी सुनील सुळ, श्री. किरण बापू राऊत, सौ. पूनम तानाजी पानसकर, श्री. अनिल भाऊसाहेब सूळ, सौ. तायडा भीमराव खिलारे असे बारा सदस्य उपस्थित होते. सौ‌ अश्विनी वैभव वावरे या उपस्थित नव्हत्या. सकाळी दहा ते बारा पर्यंत उपसरपंच पदाकरता नामनिर्देश पत्र भरून घेतलेले होते. उपसरपंच पदासाठी किशोर लक्ष्मणराव सूळ यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केलेले होते सूचक अनिल भाऊसाहेब सूळ होते.

उपसरपंच पदासाठी श्री. किशोर लक्ष्मणराव सूळ यांचा एकच अर्ज आलेला असल्याने बिनविरोध उपसरपंच पदाच्या निवडीची घोषणा करण्यात आली. यावेळी उत्साही कार्यकर्त्यांनी हलग्यांचा कडकडाट, फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला.

बिनविरोध उपसरपंच पदाच्या निवडीवेळी माजी सरपंच जालिंदर देवबाग, माजी ग्रामपंचायत सदस्य श्री. दादा आप्पा सूळ, प्रगतशील बागायतदार लक्ष्मण साळुंखे, राष्ट्रीय समाज पक्षाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष पै. रणजीत लक्ष्मण सुळ, श्री. वैभव तात्याबा वावरे, श्री‌. सुनील दादा सूळ, श्री. दत्तात्रय मनोहर सुळ, श्री‌. सुभाष सिताराम सुळ, श्री. सोमनाथ बापू सुळ, माजी ग्रामपंचायत सदस्य श्री. भागवत बापू झेंडे, श्री. सतीश पांडुरंग झंजे, श्री. भीमराव महादेव खिलारे, श्री‌. महादेव गेना माने, श्री. सूर्यकांत शंकरराव जमदाडे, श्री. बाबुराव भिसे, श्री. तानाजी राजाराम साळुंखे, श्री. ईश्वर साहेबराव सुळ, फिरकी वेब सिरीजचे मार्गदर्शक श्री. सोमनाथ जगन्नाथ दडस सर यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विशेष उपस्थिती बिनविरोध उपसरपंच श्री किशोर लक्ष्मणराव सूळ यांचे नातेवाईक व परिवारातील सदस्य उपस्थित होते. परिवारातील महिला भगिनी यांनी बिनविरोध उपसरपंच यांचे औक्षण करून पेढा भरविला. पार्टीचे प्रमुख माजी सरपंच जालिंदर देवबा सूळ यांनी बिनविरोध उपसरपंच किशोर लक्ष्मणराव सूळ यांचा सन्मान केला. यावेळी सरपंच निवडणूक प्रमुख ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी प्रमुख नेते मंडळींसह उपसरपंच यांचेही मनोगत झाले. मोरोची गावचे ग्रामदैवत मोरजाई देवीचा आशीर्वाद घेण्याकरता सर्व नेतेमंडळी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य वाजत गाजत आनंदोत्सव साजरा करीत दर्शन घेण्याकरता गेले होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button