माळशिरस तालुक्यातील रस्त्यांसाठी १०० कोटी रुपये मंजूर – आमदार राम सातपुते
माळशिरस तालुक्याचे रस्ते होणार चकाचक !
आमदार राम सातपुतेंनी आणला माळशिरसला सर्वाधिक निधी
पिलीव (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील रस्त्यांच्या नूतणीकरणासाठी तब्बल १०० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आमदार राम सातपुते यांच्या प्रयत्नातून हा निधी मंजूर झाला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने हा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार राम सातपुते यांनी दिली.
माळशिरस तालुक्यातील रस्त्याची दुरावस्था होती, ही गोष्ट लक्षात आल्यानंतर आमदार राम सातपुते यांनी यामध्ये लक्ष घातले होते. राज्यामध्ये रस्त्यांसाठी सर्वात जास्त निधी हा माळशिरस मतदारसंघासाठी खेचण्यात यशस्वी झाले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा निधी मिळाला असल्याची माहिती आमदार राम सातपुते यांनी दिली.
आमदार राम सातपुते यांनी रस्त्यांसाठी आणलेल्या या भरघोस निधीमुळे माळशिरस तालुक्यातील रस्त्यांचे चित्र बदलणार आहे. आजपर्यंत तालुक्यात एवढा मोठ्या प्रमाणात पहिल्यांदा निधी मंजूर झाला आहे. अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागला असल्याची भावना तालुक्यातील नागरिक व्यक्त करत आहेत. तालुक्यातील फळवणी येथे निरा उजवा कालव्यावरती लहान पुल करणे १ कोटी २५ लाख, खुडूस येथे ७७ चौकीवरती लहानपुलाचे बांधकाम करणे ७५ लाख, बिजवडी ते सवतगव्हाण रस्ता करणे १ कोटी, एकशिव जाधववाडी फुले वस्ती रस्ता करणे २ कोटी ४० लाख, झंजेवाडी ते तरंगेखोरा रस्ता करणे ९० लाख, वेळापूर-शेरी रस्ता करणे २ कोटी, फळवणी ते आसबे वस्ती ९० लाख, फोंडशिरस कुचेकर वस्ती ते माणिक बळवंत वाघमोडे वस्ती ५० लाख, पिंपरी येथे पाटील वस्ती ते खडकमळा उंबरदेव ९० लाख, धर्मपुरी चोपडे माने वस्ती ५० लाख, गिरझणी रामोशी वस्ती ५० लाख, बचेरी ते शिखरवस्ती ८० लाख, शिंदेवाडी ते डोंबाळवाडी रस्ता करणे ६० लाख, कोथळे येथील मानेवस्ती ७० लाख, सुळेवाडी ते कारखेल ४० लाख, मेडद ते तुपेवसती ७० लाख, तांबवे येथे ८० लाख, दत्तनगर ते चौंडेश्वरवाडी ९० लाख, डोंबाळवाडी भगत वस्ती ६० लाख, लोणंद पोळवस्ती ते श्रीनाथ नगर ५० लाख, डोंबाळवाडी ते कुरबावी ७० लाख, तिरवंडी ते बंदरा रस्ता करणे ४० लाख, कदमवाडी ते इंगळे वस्ती ५० लाख, गुरसाळे धांडे वस्ती ५० लाख, गिरझणी हद्दीतील महर्षी नगर बागेची वाडी ग्रीन फिंगर्स ५० लाख, भांबुर्डी-म्हसवड रोड दत्तनगर बंडगर वस्ती मेन कॅनल खडीकर ५० लाख, गारवड ते सुळके तुकाई रस्ता ८० लाख, मगरवाडी भांडे वस्ती ५० लाख, गणेशगाव कचरुद्दीन शेख व शेंडगे वस्ती ५० लाख, शिंगोर्णी ते कदमवाडी ८० लाख, चाकोरे जाधववस्ती खरात वस्ती ५० लाख, बांगर्डे कात्ररमळा ५० लाख, काळमवडी कोळेगाव १ कोटी, सवतगव्हाण ते चौरे वस्ती भुजबळ जगताप वस्ती ६० लाख, गिरझणी संग्रामनगर रोड ५० लाख, उंबरे दहिगाव ते मारकडवाडी ५० लाख, मारकडवाडी ते मेडद ३० लाख, खुडूस ते पानीव ३० लाख, विजोरी राऊत गट ३० लाख, साळमुखवाडी जोड रस्ता करणे ५० लाख, इंचगाव जिल्हा हद्द मार्ग १ कोटी, जिनपुरी शेरेवाडी ५० लाख, मळोली जाधव शेरेवस्ती ४० लाख, कोळेगाव ते बचेरी ५० लाख, शेंडेचिंच ते काळे वस्ती ८० लाख, दसुर पिराची कुरवली रस्ता ७० लाख, उघडेवाडी ते बोरगाव ५० लाख, माळीनगर काळा मारुती ६० लाख, संगम ते इंगळे वस्ती ५० लाख, संगमेश्वर ग्रामपंचायत संगम पराडे वस्ती इंगळे भोई वस्ती मस्के वस्ती मार्गे बाबुळगाव शिववस्ती ५० लाख, खुडूस बोरकर वस्ती निमगाव रोड ५० लाख, खंडाळा नागठाणे मगर वस्ती ५० लाख, पिसेवाडी निमगाव वेळापूर रस्ता ते निमगाव खंडाळी रस्ता ५० लाख, निमगाव तरंगफळ रस्ता १ कोटी, हनुमान नगर कचरेवाडी १ कोटी ५० लाख, इ.जी.मा ७३ ते महामार्ग 213 जिल्हा हद्द मार्ग १ कोटी ५० लाख, इस्लामपूर मेन कॅनॉल पवार वस्ती यादव कोळेकर वस्ती ते मोटेवस्ती १ कोटी, विजयवाडी राजहंस कुकुटपालन हनुमान मंदिर यशवंतनगर ४० लाख, तिरवंडी ते हजारे वस्ती विजयसिंह मोहिते पाटील नगर १ कोटी ४० लाख, हनुमान नगर कचरेवाडी ७० लाख, वाघोली १४४ राष्ट्रीय महामार्ग १ कोटी, मांडवे कन्हेर मांडकी जळभावी रोड ५ कोटी, महाड पंढरपूर रस्ता ते मांडवी गिरवी सोळ मळा २ कोटी ५० लाख, राष्ट्रीय महामार्ग १४४ टेळे वस्ती १ कोटी २० लाख, मांडवे जगताप वस्ती १ कोटी ८० लाख, मांडवे सालगुडे वस्ती ९० लाख, यशवंतनगर गिरझणी पाणीव निकमवाडी तरंगफळ गारवड १२ कोटी, वेळापूर घुमेरा वड्यावर पूल बांधणे ५ कोटी, पिलीव येथील शासकीय विश्रामगृहासाठी ३ कोटी ६० लाख, बांगार्डे फोंडशिरस सदाशिवनगर फडतरी खुटबावी रोड ६० लाख, धर्मपुरी शिंदे वस्ती रस्ता ६ कोटी, कोथळे कारुंडे रस्ता ४ कोटी ३५ लाख, चांदापुरी कुसमोड मळोली रस्ता ३ कोटी, निमगाव मळोली २ कोटी ५० लाख, गोरडवाडी माणिक दुकानदार वस्ती ते जिल्हा सरहद्द २ कोटी आदी मार्गांना मंजुरी मिळाली आहे.
माळशिरस तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – आमदार राम सातपुते
माळशिरसच्या शेवटच्या घटकांना न्याय देण्यासाठी तालुक्याचा विकास करण्यासाठी माझ्यावर जनसेवक म्हणून दिलेली जबाबदारी मी पार पाडत आहे. या तालुक्याने माझ्यावर दिलेली जबाबदारी पार पाडत असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी तालुक्याला जे जे मागितले ते दिले. रस्त्यांसाठी मी १०० कोटी रुपये आणू शकलो याचा आनंद आहे. तालुक्यातील रस्त्यांमुळे मोठ्या प्रमाणात विकासाला चालना मिळणार असल्याची भावना आमदार राम सातपुते यांनी बोलताना व्यक्त केली.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Nice post. I learn something totally new and challenging on websites