वेळापूर मुलींच्या संघाची लंगडी तालुका अजिंक्यपदाची हॅट्रिक !

वेळापुर (बारामती झटका)
माळशिरस तालुकास्तरीय लंगडी मोठा गट क्रीडा स्पर्धेमध्ये सलग दुसऱ्या वर्षी वेळापूर मुलींच्या संघानी अजिंक्यपद पटकावले. माळशिरस तालुका पंचायत समितीच्या वतीने आयोजित केलेल्या विविध क्रीडा प्रकारातील लंगडीच्या तालुकास्तरीय स्पर्धा यशवंतनगर केंद्र शाळेमध्ये शनिवार (दि. १६) रोजी संपन्न झाल्या. येथे रंगलेल्या अंतिम सामन्यात वेळापूर मुलीच्या संघाने फडतरी आणि पाटील वस्ती संघावर एक डाव राखून मात केली आणि जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी प्रवेश निश्चित केला.


यशस्वी संघाला क्रीडा शिक्षक नितीन चव्हाण, राजेंद्र जाधव यांच्यासह अशोक पवार, प्रज्ञा इंगोले, कृष्णदेव तुपे, प्रवीण पांगे, स्वयंसेविका प्रणाली गाढवे, बाबर यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी संघाला अजिंक्य पदाची ट्रॉफी यशवंतनगर केंद्राच्या केंद्रप्रमुख महादेवी गुंड, विठ्ठल नष्टे, मुख्याध्यापक बंडू खडतरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.

मुलींनी मिळविलेल्या या सातत्यपूर्ण यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख, वेळापूर केंद्रप्रमुख महादेव घोगरे, नूतन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रणजीत सरवदे, उपाध्यक्ष सुनील साठे यांनी अभिनंदन केले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.