खुडूस गावची कन्या केतकी ज्ञानदेव कांबळे यांना पीएचडी पदवी जाहीर करण्यात आली.

माळशिरस (बारामती झटका)
शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेमधून खुडुस गावची कन्या केतकी ज्ञानदेव कांबळे यांना विद्यावाचस्पती (Ph.D.) हि पदवी जाहीर झाली. कोल्हापूर जिल्ह्यातील एफएमसीजी कंपन्यांच्या विपणन करणाबाबत ग्राहकांच्या वर्तनाचा अभ्यास या विषयात संशोधन करून विद्यापीठास शोधप्रबंध सादर केला होता.
या संशोधनासाठी त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास संस्था (बार्टी), पुणे यांच्याकडून अधिछत्रवृत्ती प्राप्त झाली होती. त्यांना संशोधन मार्गदर्शक म्हणून डॉ. दीपा इंगवले यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्रा. एस. एस. महाजन, अधिष्ठाता, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा, विभागप्रमुख प्रा. ए. एम. गुरव, डॉ. के. व्ही. मारुलकर यांचे मार्गदर्शन लाभले. माळशिरस तालुक्यातील खुडुस गावचे जेष्ठ नेते श्री. डी. जी. कांबळे उर्फ नाना माजी सिनेट सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, यांच्या त्या कन्या आहेत.


नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.