कदमवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील आर्या कदम १०० मी. धावण्याच्या स्पर्धेत तालुक्यात प्रथम

कदमवाडी (बारामती झटका)
कदमवाडी ता. माळशिरस येथील जिल्हा परिषद शाळेतील कु. आर्या नवनाथ कदम हिचा तालुकास्तरीय १00 मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. तसेच तिचे प्रशिक्षक श्री. पिसे सर व पालक श्री. नवनाथ कदम यांचाही सत्कार करण्यात आला.


कु. आर्या नवनाथ कदम जिल्हा परिषद शाळा, कदमवाडी येथे इयत्ता ५ वी. मध्ये शिकत आहे. जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम या जोरावर तिने हे यश मिळविले आहे. यामध्ये तीला शिक्षकांबरोबर तीच्या आईवडीलांचेही मार्गदर्शन मिळाले. या यशाबद्दल तिच्यावर कौतुकांचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


याप्रसंगी अध्यक्ष श्री. देविदास महादेव कदम, उपाध्यक्षा सौ. राधिका आजिनाथ कदम, सदस्य सागर इंगळे, रामचंद्र भोसले आदींसह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.