रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदासजी आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप…

नातेपुते (बारामती झटका)
नातेपुते ता. माळशिरस, येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदासजी आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त नातेपुते पंचक्रोशीतील शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. सदरचा कार्यक्रम राज्य उपाध्यक्ष नंदकुमार केंगार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
सदर कार्यक्रमाचे सूञसंचालन संघर्ष सोरटे यांनी केले तर, प्रास्ताविक रोहित उर्फ बादल सोरटे (तालुका सरचिटणीस) यांनी केले. यावेळी बशीर काझी, रोहित सोरटे, दत्तू कांबळे पाटील, राज्य उपाध्यक्ष नंदकुमार केंगार यांनी मनोगते व्यक्त केली.

यावेळी डॉ. एम. पी. मोरे, नंदू लांडगे, गणेश कुचेकर, अमित चांगण, भैय्या चांगण, श्रावण सोरटे, धनाजी पवार तालुका अध्यक्ष, दादा भालेराव, प्रीतम साळवे, विशाल सोरटे, संघर्ष सोरटे, राकेश सोरटे, सौरभ साळवे, अमर सावंत, यश काकडे, वैभव सोरटे, शुभम भोसले, मानव सोरटे, गणेश सोरटे, अक्षय सावंत, राज साळवे, रोहित साळवे, राजू वनवे, रियाज शेख, आदर्श सोरटे, सुगत सोरटे, संघर्ष राजू सोरटे, प्रणव सोरटे, बबलू रणदिवे, रोहित शेख, तालुका कार्याध्यक्ष सचिन गायकवाड, प्रशांत ठोंबरे, राष्ट्रवादीचे नेते शुभम सोरटे आदिंसह शाळेच्या मुख्याध्यापिका जाधव मॅडम, बडवे सर, काळे मॅडम, लाळगे मॅडम, गांधरे सर, गायकवाड मॅडम यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे आभार युवराज वाघमारे यांनी मानले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.