ताज्या बातम्याराजकारण

माढा लोकसभा मतदारसंघातील समदुःखी शिवरत्न बंगला येथे एकत्र आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली…

विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील परिवार यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आलेले आहे.

अकलूज (बारामती झटका)

विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर यांनी शिवरत्न बंगला येथे महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील परिवार यांची सदिच्छा भेट घेतली. यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चेला उधान आलेले आहे. माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे तालुक्यातील राजकीय विरोधक व भारतीय जनता पक्षातील विरोधी विचाराचे दोन्ही गट एकत्र आल्याने माढा लोकसभा मतदारसंघातील समदुःखी शिवरत्न बंगला येथे एकत्र आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदार संघाचा दौरा सुरू केलेला आहे. माढा लोकसभा मतदार संघातील राजकीय दृष्ट्या सुपरीचीत असणारे फलटण व अकलूज येथे वॉरियर्स व प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका घेतलेल्या होत्या. सदरच्या दौऱ्यामध्ये माढा लोकसभेचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी गेल्या चाळीस वर्षात मतदार संघात कामे झालेली नाहीत, अशी कामे करून देशातील दहा खासदारांमध्ये रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचे कार्य असल्याचे सांगून भविष्यातील उमेदवारीचे सुतोवाच केलेले असल्याने राजकीय विरोधक रामराजे नाईक निंबाळकर व मोहिते पाटील परिवारातील सदस्य एकत्र आलेले सोशल मीडियावर फोटो वायरल झाल्यानंतर चर्चेला उधाण आलेले आहे. शिवरत्न बंगला येथे रामराजे निंबाळकर यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत संजीवराजे निंबाळकर, माजी आमदार प्रभाकर घाडगे, अनिल देसाई उपस्थित होते तर विजयसिंह मोहिते पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील, अर्जुनसिंह मोहिते पाटील आदी मोहिते पाटील परिवारातील सदस्य उपस्थित होते.

माढा लोकसभा मतदार संघात गतवेळच्या निवडणुकीत रामराजे निंबाळकर यांच्या समवेत आलेले व त्यांच्या परिवारातील सर्व रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात काम केलेले होते. मोहिते पाटील परिवारातील सर्व सदस्यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे काम केलेले होते. सध्या मोहिते पाटील परिवारातील धैर्यशील मोहिते पाटील माढा लोकसभेसाठी इच्छुक आहेत. मात्र, भाजपकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. त्यामुळे वेगळे राजकीय चित्र उभा करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. जरी असे असले तरी राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन अनेक सहकाऱ्यांना मंत्रिपदाची शपथ दिलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह माढा लोकसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थिती बदललेली आहे.

रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या समवेत गत निवडणुकीत बरोबर नसलेले माढा विधानसभेचे षटकार पाणीदार आमदार बबनदादा शिंदे, करमाळा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संजयमामा शिंदे, विधान परिषदेचे माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील, करमाळा तालुक्याच्या ज्येष्ठ नेत्या रश्मीताई बागल यांच्यासह अनेकांचे समर्थन मिळणार आहे. त्यामुळे मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये राहून किंवा अन्य पक्षात जाऊन रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना विरोध केला तर त्याहीपेक्षा जादा समर्थन माढा, करमाळा, सांगोला व माळशिरस तालुक्यातून मिळणार आहे, अशी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे.

सध्या तरी भारतीय जनता पक्षाकडून माढा लोकसभेचे उमेदवार अधिकृत जाहीर झालेले नाहीत. मात्र, रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना भारतीय जनता पक्षाकडून व देशाचे नेते नरेंद्रजी मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांचे विकास कामांसाठी सहकार्य मिळत असून मतदारसंघातील अनेक प्रलंबित सिंचनाचे प्रश्न, निरा-देवधर प्रकल्प, रेल्वे, रस्ते, एमआयडीसी असे अनेक प्रश्न पिढ्यानपिढ्या राजकीय नेत्यांनी झुलवत ठेवून प्रलंबित ठेवलेले रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सततचा पाठपुरावा करून प्रश्न निकाली काढण्याचे प्रयत्न करून समाजामध्ये पाणीदार खासदार अशी प्रतिमा निर्माण केलेली आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना वाढता पाठिंबा असल्याने उमेदवारी फिक्सच आहे, अशी धारणा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधकांना झालेली असल्याने समदुखी एकत्र आलेली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

One Comment

  1. I’m often to blogging and i really appreciate your content. The article has actually peaks my interest. I’m going to bookmark your web site and maintain checking for brand spanking new information.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort