खा. रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या प्रयत्नातून नगरपरिषदांना ५ कोटी ३० लाखांचा निधी मंजूर – चेतनसिंह केदार सावंत
सांगोला (बारामती झटका)
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नातून वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, माळशिरस, अकलूज, महाळुंग, करमाळा, माढा, नातेपुते या नगरपालिका क्षेत्रातील विविध विकासकामांसाठी ५ कोटी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली.
सांगोला नगरपरिषद क्षेत्रातील मारुती मंदिर परिसरात नवीन सभामंडप व सुशोभीकरण दहा लाख, पारवे रोड ते वसंत केदार घर रस्ता दहा लाख, साठे नगरसमोरील शौचालय हरित पट्टा येथे कॉंक्रिटीकरण दहा लाख, तेली गल्ली येथील सार्वजनिक शौचालय ते दगडू शिर्के घर रस्ता १३ लाख, एखतपूर रोड ते जुना आरक्षण क्रमांक ४६ बगीचा मध्ये लादीकरण करणे १३ लाख, चिंचोली रोड येथील बुरांडे वस्ती येथे अंतर्गत रस्ता करणे १४ लाख, आरक्षण क्रमांक ४६ मधील बगीचा सुशोभीकरण करणे १० लाख, हॉटेल गोल्डन लिफची पश्चिम बाजू वाढेगाव रस्ता ते ओढ्यापर्यंत रस्ता सुधारणा करणे १० लाख अशी एकूण 90 लाख रुपयांची कामे मंजूर झाली आहेत.
करमाळा नगरपरिषद क्षेत्रातील गणेश नगर येथे नगरपालिका जागेत महिला भवन बांधणे १० लाख, महाराणा प्रताप पुतळा ते सुकुमार दोषी घरापर्यंत गटार करणे १० लाख, कुंभारवाडा ते कत्तलखाना रस्ता करणे १० लाख, राहुल निकम घर ते जुने महाराजा वाईन शॉप गटार बांधणे १० लाख, जुना बारलोणी रस्ता भीमनगर फुलापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण १० लाख, नगरपालिका शाळा क्रमांक २ संरक्षण भिंत बांधणे १० लाख, मारुती मंदिरा शेजारी व्यायाम शाळा व वाचनालय बांधणे २० लाख, प्रभाग क्रमांक ४ मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये सुशोभीकरण करणे १० लाख, श्री संत सेना महाराज मंदिरासमोर सभामंडप १० लाख रुपये अशी एक कोटी रुपयांची कामे मंजूर झाली आहेत.
माढा नगरपरिषद क्षेत्रातील वार्ड क्रमांक १२ मध्ये संत सेना महाराज मंदिर संरक्षण भिंत बांधणे १० लाख, सन्मतीनगर येथील गणपती मंदिर परिसर सुशोभीकरण करणे १० लाख, वार्ड क्रमांक १० मध्ये शिकलकर गल्ली येथे नवीन पाण्याचा हौद बांधणे १० लाख, राजाभाऊ चौरे वस्ती ते माढा-चिंचोली रस्ता कॉंक्रिटीकरण २० लाख, खंडोबा मंदिर कुंभार गल्ली कसबा पेठ येथे सभा मंडप बांधणे १० लाख, वार्ड क्रमांक ८ माढा शेटफळ रस्ता ते सुहास जाधव घर रस्ता काँक्रिटीकरण १० लाख, सुनील लंकेश्वर घर ते विलास माने घर रस्ता करणे १० लाख अशी ८० लाख रुपयांची कामे मंजूर झाली आहेत.
नातेपुते नगरपरिषद क्षेत्रातील बळी मंदिर ते बाजार रोड अंतर्गत रस्ते व भुयारी गटार करणे १० लाख, उमाजी नाईक नगर येथील सुतारकर ते शेंडगे घरापर्यंत रस्ता करणे १० लाख, प्रभाग क्रमांक ५ मध्ये मेडद रोड ते बंडगर खोरी रस्ता करणे १० लाख, प्रभाग क्रमांक २ मंडले गुरुजी ते भानुदास उराडे घरापर्यंत रस्ता करणे १० लाख, प्रभाग क्रमांक ५ पुणे पंढरपूर रोड ते भिसे घर गटार, पिण्याची पाण्याची पाईपलाईन व रस्ता मुरमीकरण १० लाख, सदाशिव राऊत वस्ती ते ढगे वस्ती रस्ता करणे १० लाख अशी ६० लाख रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत.
माळशिरस नगरपरिषद क्षेत्रातील अकलूज रोड ते रवी शंकरजी यांच्या मठापर्यंत रस्ता करणे १५ लाख, प्रभाग क्रमांक ३ मधील ६१ फाटा कॅनॉलवर आरसीसी पूल बांधणे १० लाख, प्रभाग क्रमांक 12 मधील शिक्षक कॉलनी येथे सभामंडप १० लाख, प्रभाग क्रमांक ७ मधील होलार वस्ती येथे सभामंडप बांधणे १० लाख, प्रभाग क्रमांक ८ मधील 58 फाटा येथे विनोद थोरात यांच्या घरापर्यंत रस्ता करणे आणि मेडद रोड ते माऊली गोसावी यांच्या घरापर्यंत रस्ता करणे १५ लाख, प्रभाग क्रमांक ८ मधील मेडद मायनर वरती पूल बांधणे १० लाख, लक्ष्मीमंदिर वाघमोडे वस्ती येथे सभामंडप बांधणे १० लाख, कोंडबावी ते यादव वस्ती रस्त्या करणे १० लाख, वार्ड क्रमांक १२ गणेश नगर येथील नक्षत्र कॉलनी येथे रस्ता व गटार करणे १० लाख, वार्ड क्रमांक ११ शहा धारशी कॉलनी येथे बागबगीचा विकसित करणे १० लाख, वार्ड क्रमांक १२ रणजित मोटे बंगला ते जुना भांबुर्डी रस्ता करणे १० लाख, अकलूज रोड ते टिळे, घोडके वस्ती रस्ता सुधारणा करणे १० लाख अशी एकूण १ कोटी ३० लाख रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत.
अकलूज नगर परिषद क्षेत्रातील कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत रस्ते करणे १० लाख, वार्ड क्रमांक १३ मधील २१ चारी दत्तमंदिर बोडके वस्ती रस्ता करणे १० लाख अशी २० लाख रुपयाची कामे मंजूर करण्यात आली आहेत. तसेच महाळुंग नगरपंचायत क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ५ मध्ये सांस्कृतिक भवन बांधणे १० लाख, प्रभाग क्रमांक १२ मध्ये समाज मंदिर बांधणे १० लाख, महाळुंग स्मशानभूमी येथे लादीकरण करणे १० लाख, प्रभाग क्रमांक ११ मधील संभा मोहिते घर ते डॉ. सावंत घर मुख्य पालखी मार्ग रस्ता काँक्रीटीकरण करणे १० लाख, प्रभाग क्रमांक २ मधील नवनाथ वाघमोडे वाघमोडे रस्ता करणे १० लाख अशी एकूण ५० लाख रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Great mix of humor and insight! For more, visit: READ MORE. What do others think?