ग्रामविकास तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा बुधवार व गुरुवार सोलापूर जिल्हा दौरा जाहीर…

सोलापूर (बारामती झटका)
मा.ना.श्री. जयकुमार गोरे मंत्री, ग्रामविकास व पंचायत राज, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, सोलापूर जिल्हा यांचा बुधवार व गुरुवार, दि. ११ व १२, जून, २०२५ रोजीचा मुंबई, सोलापूर, सातारा जिल्हा दौरा कार्यक्रम जाहीर झाला आहे.
बुधवार, दि. ११.०६.२०२५ रोजी रात्री. १०.१५ वा. ‘प्रचीतगड क-६’, शासकीय निवासस्थान, मुंबई येथून मोटारीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेलवे स्टेशन (CSMT), मुंबईकडे प्रयाण, १०.३० वा. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेलवे स्टेशन (CSMT), येथे आगमन व १०.४० वा. सिद्धेश्वर एक्सप्रेस-१२११५ रेल्वेने सोलापूरकडे प्रयाण असा असणार आहे.
गुरुवार, दि. १२.०६.२०२५ रोजी सकाळी ०६.५० वा. ०६.५५ वा. रेल्वे स्टेशन, सोलापूर येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृह, सोलापूरकडे प्रयाण, ०७.०५ वा. शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे आगमन व राखीव, १०.४५ वा. शासकीय विश्रामगृह येथून हॉटेल, बालाजी सरोवर प्रीमिअर, सोलापूरकडे प्रयाण, १०.५५ वा. हॉटेल, बालाजी सरोवर प्रीमिअर, सोलापूर येथे आगमन, ११.०० वा. विकसित भारताचा अमृतकाल संदर्भात पत्रकार परिषदेस उपस्थिती, ११.३० वा. भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष (ग्रामीण व शहर) तसेच जिल्ह्यातील सर्व भाजपा मंडल अध्यक्ष यांचे समवेत बैठकीस उपस्थिती. (स्थळ हॉटेल, बालाजी सरोवर प्रीमिअर, सोलापूर), दुपारी १२.४५ वा. सोलापूर येथून पंढरपूर, जि. सोलापूरकडे प्रयाण, ०२.०० वा. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान समिती सभागृह, पंढरपूर येथे आगमन व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान समिती यांचे समवेत आषाढी वारीच्या अनुषंगाने बैठकीस उपस्थिती, ०२.४५ वा. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान समिती सभागृह, येथून शासकीय विश्रामगृह, पंढरपूरकडे प्रयाण, ०३.०० वा. शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथे आगमन व राखीव, पंढरपूर येथून (म्हसवड मार्गे) बोराटवाडी, ता. माण, जि. साताराकडे प्रयाण. ‘कमलकुंज’ निवासस्थान, बोराटवाडी येथे आगमन व राखीव असा असणार आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.