चि. खंडू (नानासाहेब) माने, बचेरी आणि चि. सौ. कां. रत्नावली (भारती) खरात, पिलीव यांचा शाही शुभविवाह सोहळा उत्साहात संपन्न

माजी उपसभापती किशोरभैया पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष अजितभैया बोरकर यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
बचेरी (बारामती झटका)
श्री. शंकर दाजी माने यांचे नातू व श्री. देना शंकर माने रा. बचेरी, ता. माळशिरस यांचे कनिष्ठ सुपुत्र चिरंजीव खंडू उर्फ नानासाहेब आणि श्री. जयवंत हरी खरात यांची नात व श्री. सतीश जयवंत खरात रा. पिलीव, ता. माळशिरस यांची सुकन्या चि. सौ. कां. रत्नावली उर्फ भारती यांचा शाही शुभविवाह सोहळा गुरुवार दि. ४/१/२०२४ रोजी दुपारी १.५२ वा. शिवतीर्थ मंगल कार्यालय, पिलीव-पंढरपूर रोड, साळमुख, ता. माळशिरस येथे उत्साहात संपन्न झाला. यावेळी पिलीव पंचक्रोशीतील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी वधू-वरांना वाजत-गाजत व्यासपीठाकडे आणण्यात आले. या शाही शुभ विवाह सोहळ्यासाठी माजी उपसभापती किशोरभैया पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष अजितभैया बोरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.